शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईला पदरिक्ततेचा खोडा

By admin | Updated: June 11, 2014 23:25 IST

‘ठंडा पाणी पाऊच पाच में दो’, अशी हाक प्रवासादरम्यान नेहमीच ऐकायला मिळते. गळ्यात थर्माकॉलची पेटी आणि हातात एक दोन पाणी पाऊच घेवून विकणारी मुले बसस्थानक, रेल्वेस्टेशन परिसरात हमखास

जागतिक बालकामगार दिन : वर्षभरात शोधला केवळ एक बालकामगारश्रेया केने - वर्धा‘ठंडा पाणी पाऊच पाच में दो’, अशी हाक प्रवासादरम्यान नेहमीच ऐकायला मिळते. गळ्यात थर्माकॉलची पेटी आणि हातात एक दोन पाणी पाऊच घेवून विकणारी मुले बसस्थानक, रेल्वेस्टेशन परिसरात हमखास नजरेस पडतात. बालकांना शिक्षण देवून त्यांचे बाल्य खुरटले जाणार नाही या दृष्टिकोनातून शासनाने बालकामगार विरोधी अधिनियम तयार केला. यात दंडाची व शिक्षेची तरतूदही केली. मात्र अंमलबजावणी अभावी या नियमाला आस्थापनाधारकांकडून तिलांजली दिली जात आहे. जिल्ह्यातही पदरिक्ततेमुळे कारवाई करण्यात अडसर येत असून गत वर्षभरात केवळ एकाच बालकामगाराचे पुनर्वसन करण्यात आले आहे. १२ जून हा दिवस जगभरात बालकामगार दिन म्हणून पाळण्यात येतो. परिस्थितीअभावी घराकरिता काहीतरी कमावण्याची जबाबदारी या बालकांच्या खांद्यावर येवून त्यांचे बाल्य श्रमातच व्यथित होवू नये याकरिता शासन विविध योजनेच्या माध्यमातून प्रयत्नरत असते. मोफत शिक्षण, माध्यान्ह भोजन या योजनेद्वारे बालकांना त्यांचा हक्क मिळवून दिला जातो. देशभरात विविध आस्थापना, उपहारगृह, बांधकाम कंपनी येथे ही लहानगी मुले राबताना दिसतात. कमी वेतनात अधिक श्रम या बालकांकडून करवून घेतले जाते. त्यामुळे त्यांचे शारीरिक व आर्थिक शोषण होत होते

या प्रकाराला प्रतिबंध घालण्याकरिताच शासनाने १९८६ साली ‘चाईल्ड लेबर अ‍ॅक्ट’ अस्तित्वात आणला. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी कामगार कार्यालयाकडे देण्यात आली. यात ‘कृती दल’ तयार करून कारवाईचा अधिकार दिला. पण कारवाईचे वावडे असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांकडून नेहमीच याबाबतीतही असंवेदनशिलतेचा प्रत्यय येतो. जिल्ह्यात कामगार विभागातील एकून आठ पदांपैकी पाच पदे रिक्त असल्याने कारवाई करण्यात मोठा अडसर येत आहे. याशिवाय जागृतीचा अभाव असल्याने सर्रास बालकामगार विविध उपहारगृहे व आस्थापनात दिवसरात्र राबताना दिसतात. कचरा वेचणारी, भंगार गोळा करणारी, पाणी पाऊचची विक्री, चहाटपरी येथे काम करणाऱ्या बालमजुरांची तर गणतीच नाही. उन्हाळ्यात तर शाळांना सुटी असल्याने आपल्या कुटुंबाला ‘हातभार’ म्हणून अनेक मुले कामाच्या शोधात असतात. आपल्याकरिता शासनाने भरीव अनुदान व योजना तयार केल्या आहेत. याचा मागमुसही या मुलांना नसतो. त्या कामातच या बालकांचे बालपण हिरावले जाते. जिल्ह्यात सामाजिक संस्थांचाही यात पुढाकार तुलनेने कमी असल्याने कुणालाही याचे सोयर सुतक नसावे, अशीच अवस्था आहे.