शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

पित्याची सुश्रृषा करणाऱ्या पुत्रावर नियतीचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2018 12:52 AM

आजारी वडीलांची सेवा करण्यासाठी महाविद्यावयीन शिक्षण घेत असतांना वेळोवेळी लक्ष ठेवणाºया मुलांवर काळाने घाला घातला या घटनेने समाजमन ढवळून निघाले आहे.

ठळक मुद्देयवतमाळच्या कॉलेजमध्ये आला झटका : अख्खे गाव हळहळले

लोकमत न्यूज नेटवर्कपुलगाव : आजारी वडीलांची सेवा करण्यासाठी महाविद्यावयीन शिक्षण घेत असतांना वेळोवेळी लक्ष ठेवणाºया मुलांवर काळाने घाला घातला या घटनेने समाजमन ढवळून निघाले आहे.बढे ले-आऊट नाचणगाव रहिवासी रोजमजुरी करणारे रामराव सिरसकर हे पत्नी, मुलगी व मुलासह हे मागील एक महिन्यापासून ब्रेन हॅमरेज मुळे सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल आहेत. घरात अठरा विघ्ने दारिद्रय असतानाही त्यांनी आपल्या मुलीला अभियांत्रिकी शिक्षण दिले व लहान मुलगा हितेश यालाही यवतमाळ येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश दिला. हितेश हा २२ वर्षीय तरुण अभियंता होण्याच्या मार्गावर असतानाच वडील रामराव यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्यामुळे तो यवतमाळकडून नाचणगाव सतत येवून वडिलाच्या प्रकृतीकडे लक्ष ठेवत होता. परंतु त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याचे वैद्यकीय अधिकाºयांनी त्यांना घरी नेण्याचा सल्ला दिला. आयुष्याच्या महत्त्वाच्या वळणावर असतानाच नियतीने त्याचा घात केला. आणि मृत्यु शय्येवर असणाºया पित्याला पाहून तो कॉलेज मध्ये असतानाच त्यांच्यावर मृत्यूने घाला घातला. नुकत्याच घडलेल्या हृदयाला पाझर फोडणाºया घटनेने संपूर्ण परिसर हळहळला.रामराव सिरसकर पुलगाव कॉटन मील मध्ये कामगार होते. परंतु २००३ मध्ये मील बंद झाल्यामुळे रोजमजुरी करुन कुटुंबाचा गाडा चालवित होते. चार जणांच्या कुटुंबात मोठी मुलगी, मुलगा व वयोवृद्ध झालेले पती, पत्नी मील बंद झाल्यामुळे थोडी बहुत जी रक्कम मिळाली त्यात त्यांनी मुलीला उच्च शिक्षण देवून स्वत:च्या पायावर उभी राहावी म्हणून अभियंता बनविले. परंतु नौकरी नाही तर मुलगा हितेश हा यवतमाळ येथे अभियांत्रिक अभ्यासक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात शिक्षण घेत होता.मुलांना उच्च शिक्षण देतांना आपल्या परिवाराच्या उज्वल भवितव्याची स्वप्ने रंगवित असताना त्यांना एक महिन्यापूर्वी ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकीकडे अभियांत्रिकी शिक्षणाचा बोझा तर दुसरीकडे मृत्यु शय्येवर असणारे वडील अश्या द्विधा मन:स्थितीत हितेश असतानाच रामराव कोमामध्ये गेले. टकटक पहाणाºया पलीकडे त्यांच्या शरीराची कुठलीच हालचाल होत नव्हती. परिस्थिती जेमतेमच, आजार मोठा, वडिलांना घरी आणण्या शिवाय पर्याय नव्हता तो मन घरी ठेवून कॉलेज जात होता. टकटक पाहणाºया वडिलाचा चेहरा त्याच्या डोळयापुढे सतत उभा राहणे स्वाभाविकच कारण जन्मदाता पिताच तो अशा विचित्र मन:स्थितीत असतानाच त्याला ७ आॅगस्ट रोजी यवतमाळ येथील कॉलेज मध्ये असतानाच त्याला जबरदस्त अ‍ॅटक येवून नियतिने आपला डाव साधला या घटनेमुळे या कुटुंबावर जणू आभाळच कोसळले. घटनेचे वृत्त कळताच संपूर्ण परिसर गहिवरुन एकवटला.यवतमाळवरुन हितेशचा मृतदेह आल्यानंतर आई व बहिणीनी फोडलेल्या हंबरड्यामुळे सारा परिसर कसा स्तब्ध झाला. प्रत्येकाच्या डोळयातून अश्रुच्या धारा वाट मोकळी करीत होत्या.परिसरातील मंडळीनीच हितेशच्या अंत्यसंस्काराची तयारी करुन हजारो चाहत्यांनी त्याला अखेरचा निरोप दिला. उज्वल भवितव्याची स्वप्ने रंगविणारा तरुण मुलगा गेला. लग्नाच्या ंउंबरठ्यावर असणारी मुलगी, मृत्यु शय्येवर असणारा पती अश्या अवस्थेत हितेशच्या आईची करुणावस्था पाहून सारेच गहिवरले .कुटुंबाला मदतीचा हात द्यालोकप्रतिनिधी, शासन यांनी या कुटुंबाला शासकीय, वैयक्तिक स्तरावर मदतीचा हात द्यावा, कुटुंबातील महत्वाचा आधार सोडून गेल्याने मृत्यू शय्येवर असलेल्या वडीलांवर आता मोठे संकट आले आहे. त्यामुळे मदत द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाStudentविद्यार्थी