शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूसदृश आजाराचे थैमान

By admin | Updated: October 15, 2014 23:21 IST

गत काही दिवसांपासून शहरातील काही भागात डेंग्यूसदृश आजाराचे प्रस्थ वाढले आहे. आता पर्यंत पाच बालकाचा या आजाराने मृत्यू झाला आहे. याची दखल घेत नगर प्रशासनाने तातडीच्या काही

पुलगाव : गत काही दिवसांपासून शहरातील काही भागात डेंग्यूसदृश आजाराचे प्रस्थ वाढले आहे. आता पर्यंत पाच बालकाचा या आजाराने मृत्यू झाला आहे. याची दखल घेत नगर प्रशासनाने तातडीच्या काही उपाययोजना केल्या; परंतु तेवढ्याने या रोगाचे आक्रमण थांबले नसून आजाराने नव्याने डोके वर काढले आहे. आजाराचे प्रमाण काढल्याने खासगी व शासकीय रुग्णालयात रुग्णसंख्येत कमालीची वाढ झाली आहे. शहरातील बोहरा गल्लीतील एक व इरिराम नगरातील दोन अशा तीन रुग्णांना वर्धा येथे दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. निवडणुकीच्या प्रचार कार्यात मशगूल असणाऱ्या नगरसेवकांना स्वत:च्या प्रभागांतील स्वच्छता व नागरिकांच्या सार्वजनिक आरोग्याकडे लक्ष पुरविण्यासाठी वेळ नसल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक भागातील नाल्या स्वच्छ नसल्याची तर साफ झालेल्या नाल्यातील घाण नालीकाठीच पडली असल्याची नागरिकांची ओरड आहे. गांधी चौक धर्मशाळा, फुटाणा लाईनजवळील भाग दीनदयाल चौक हे नित्याचे वर्दळीचे ठिकाण असूनही याकडे नगर प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. बोहरा गल्ली, हरिरामनगर येथील साचलेला केर कचरा व हरिराम नगरातून वाहणारा नाला यातील केरकचरा व घाणीमुळे या भागात सध्या डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी बोहरा गल्लीतील समिना मुस्तफा बोहरा (३०) इरिराम नगरातील प्रशांत प्रकाश राठी (३०) व अमीत राठी (३६) या तिघांना डेंग्यूसदृश आजाराची बाधा झाली. त्यांना वर्धा येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. डेंग्यूसदृश आजाराचे प्रस्थ जास्त वाढण्यापूर्वीच स्थानीय प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. परिसरात फॉगिंग मशिनद्वारे फवारणी करण्याची गरज आहे. तसेच आरोग्य व्यवस्थाही रुग्णांना चांगले उपचार देण्यात कमी पडत आहे. परिसराची स्वच्छता न केल्यास रुग्णांच्या संख्येत आणखी भर पडण्याची शक्यता व्हक्त होत आहे. परिसरातील रुग्णही येथे उपचार घ्यायला येतात. या कारणामुळेही आरोग्य व्यवस्थेवर ताण येत आहे.(तालुका प्रतिनिधी)