शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

निदर्शने, निवेदन आणि अल्टीमेटम्

By admin | Updated: August 24, 2014 23:40 IST

सहा वर्षाच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणात खऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीला घेऊन रविवारी सत्यशोधक महिला प्रबोधिनीसह विविध संघटनातर्फे स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर

चिमुकलीवरील अत्याचाराचे प्रकरण : चार दिवसानंतर तीव्र आंदोलनाचा इशारावर्धा : सहा वर्षाच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणात खऱ्या आरोपींना अटक करण्याच्या मागणीला घेऊन रविवारी सत्यशोधक महिला प्रबोधिनीसह विविध संघटनातर्फे स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करण्यात आली.येत्या चार दिवसात चिमुकलीला न्याय मिळाला नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सामजिक संघटनांच्या शिष्टमंडळामार्फत पोलीस प्रशासनाला देण्यात आला आहे. निवेदन सादर करून पोलीस अधीक्षकांशी झालेल्या चर्चेत शिष्टमंडळामार्फत अनेक गंभीर बाबींकडे लक्ष वेधण्यात आले. मुलीच्या वडिलाच्या बयानाचा सखोल तपास करताना पोलीस दिसत नाही. तो ज्यांच्याकडे बोट दाखवत आहे या बाबतही पोलीस गंभीर दिसत नाही. उलट तो काहीही बडबड करतो म्हणून त्याच्या बोलावण्याकडे पोलिसांकडून दुर्लक्ष केले जात आहे. मुलीच्या वडिलांचे म्हणणे पोलीस ऐकायला तयार नाही, तर मग मुलगी ज्या वस्तीत राहते त्या वस्तीतील नागरिकांचे म्हणणे तरी पोलिसांनी गांभीर्याने घ्यावे. त्या वस्तीतील नागरिक खऱ्या आरोपींबद्दलची माहिती पोलिसांना देत आहे; मात्र पोलीस त्यांना चूप करण्यात मशगूल झाली असल्यामुळे या प्रकरणाचे रहस्य उलगडण्याऐवजी प्रकरण दिवसेंदिवस गुंतागुंतीचे होत चालले आहे, याकडेही यावेळी लक्ष वेधण्यात आले. सुमारे अर्धा तास चाललेल्या या चर्चेतून पोलीस अधीक्षक या प्रकरणात त्या चिमुकल्या निर्भयाला न्याय देईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. शिष्टमंडळात सत्यशोधक महिला प्रबोधिनीच्या प्रा. नुतन माळवी, पद्मा तायडे, श्रेया गोडे, कल्पना तामगाडगे, शालिनी पाटील, जयश्री शाह, प्रा. जनार्दन देवतळे, किसान अधिकार अभियानचे अविनाश काकडे, राजू गोरडे, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गजेंद्र सुरकार, नरेंद्र कांबळे, प्रजासत्ताक शिक्षक संघाचे अरुण हर्षबोधी, प्रकाश कांबळे, निर्माण फांडेशनचे अमीर अली अजानी, नशाबंदी मंडळाचे मयूर राऊत यांच्यासह मंगेश शेंडे, विनायक तेलरांधे, शेख सलीम, सिद्धार्थ बुटले, किशोर शालिग्राम, राष्ट्रीय सम्बुद्ध महिला संघटनेच्या शारदा झांबरे, गुड्डू अली, गुणवंत डकरे, राजेंद्र कळसाईत, प्रिया पेंदोर, बाबा जाकीर, भीमराव लोहकरे यांचा समावेश होता.(शहर प्रतिनिधी)