शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

इम्युनिटी पॉवर वाढविणाऱ्या रोपांची मागणी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 16:06 IST

फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी नागरिक शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विविध वनस्पतींचा वापर करीत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. .

ठळक मुद्देतुळस रोपाला विशेष मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क 

वर्धा : गेल्या वर्षीपासून देशात कोरोनाच्या पहिल्या लाटेचा शिरकाव झाला, पण फेब्रुवारी, मार्च महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्यासह जिल्ह्यात थैमान घातले आहे. याचा प्रसार रोखण्यासाठी नागरिक शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी विविध वनस्पतींचा वापर करीत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. यामध्ये विशेष करून तुळस, अश्वगंधा, अद्रक, गिलोय (अमृता), पुदिना या वनस्पतीचा वापर करीत असल्याचे दिसून येते.  तसेच कडुनिंबाचा ही मोठ्या प्रमाणात वापर वाढला आहे. कडुनिंबाच्या सालीचा काढा, पाल्यांचा रस, नागरिक आवर्जून घेत आहेत, या रोपांचे गुणधर्म.

 तुळस

उचकी लागणे, खोकला, विषदोष, दमा, बरगड्यांमध्ये दुखणे वगैरे विकारांमध्ये तुळस उपयुक्त असते. कफ, तसेच वातदोषाचे शमन करणारी पित्त वाढविणारी तुळस दुर्गंधीचा नाश करण्यास सक्षम असते. तुळशीमध्ये पर्यावरणाची शुद्धी करण्याचाही गुणधर्म असतो.

 अश्वगंधा

अश्वगंधामध्ये अँटिऑक्सिटँड आणि अँटिइंफ्लेमेंटरीचे गुण आढळतात. यामुळे हृदयासंबंधीत समस्येपासून वाचता येते. अश्वगंधा चूर्ण खाल्ल्याने हृदयाच्या मांसपेशी अधिक मजबूत होतात आणि कोलेस्ट्रॉलचा खराब स्तर कमी करण्यासाठी याची मदत होते.

आले (अद्रक)

अद्रकमध्ये अँटिफंगल, अँटिसेफ्टिक, अँटिबायोटिक, अँटिव्हायरल असे विशेष गुण आहेत. त्याचबरोबर विविध प्रकारचे व्हिटॅमिन आणि खनिजेही आहेत, जे आपल्या स्वास्थ्यासाठी खूप लाभदायक आहे. म्हणून आल्याचा उपयोग औषधी सामग्रीमध्येही केला जातो,

 गिलोय (अमृता)

गिलोय गुडुची आणि अमृता म्हणूनही ओळखले जातात, हे अँटिऑक्सिडेंटमध्ये समृद्ध आहे, जे मुक्त रॅडिकल्सशी लढायला मदत करते आणि पेशींना निरोगी आणि रोगांपासून दूर ठेवते. सध्या कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यावर भर दिला जात आहे आणि हे करण्यासाठी गिलोय हा सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग आहे.

 पुदिना

आयुर्वेदानुसार पुदिना हा दीपक, पाचक, रुचकर स्वादप्रिय, हृदय, उष्ण वात आणि कफ दोषहारक व कृमीनाशक आहे, तसेच पुदिन्यामध्ये कॅल्शियम लोह, फॉस्फरस क, ड व ई जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते, तर ब जीवनसत्त्व अत्यल्प प्रमाणात असते,

माझ्या नर्सरीला जवळपास २५ वर्षे झाले, विविध प्रकारच्या सहाशे वनस्पती तयार केल्या जातात. यामध्ये औषधी वनस्पतीवर विशेष भर दिला जातो, कोरोनाच्या काळात तुळस, ब्राह्मणी या रोपांची अधिक मागणी वाढली आहे,

चंद्रकांत पदीले दहेगाव (गावंडे) वर्धा.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली, तसेच रोपांना जून, जुलै महिन्यात जास्त मागणी असते, तरीही काही प्रमाणात औषधी वनस्पतीला मागणी आहे, तुळस व गिलोय, अश्वगंधा या रोपांना बऱ्यापैकी मागणी आहे.

दिगंबर खांडरे हिंगणघाट.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस