शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

जोलवाडी-देलवाडी-अंबिकापूर रस्त्यासाठी संपादित जमिनीच्या मोबदल्याची मागणी

By admin | Updated: July 6, 2017 01:24 IST

तालुक्यातील देलवाडी-जोलवाडी-अंबिकापूर मार्गे मोर्शी रस्त्याच्या बांधकामाकरिता सन १९९५-९६ मध्ये

२१ वर्षांपासून प्रतीक्षा : जिल्हाधिकाऱ्यांना साकडे लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी (शहीद) : तालुक्यातील देलवाडी-जोलवाडी-अंबिकापूर मार्गे मोर्शी रस्त्याच्या बांधकामाकरिता सन १९९५-९६ मध्ये जिल्हा परिषद बांधकाम विभागाने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. या संपादित जमिनीचा मोबदला अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही. याला २१ वर्षे लोटले असून सदर मोबदला तात्काळ देण्याची मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकउे निवेदनातून केली. याबाबत सन २००५ मध्ये लोकशाही दिनात तक्रार देण्यात आली होती. जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता वर्धा यांचे पत्र क्र. १०७४ नुसार २० लक्ष ६६ हजार रूपयाचा धनादेश दि. ११ मार्च २००६ ला विशेष भूसंपादन अधिकारी वर्धा यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार सर्व शेतकरी व रवींद्र शिक्षण प्रसारक मंडळ देलवाडी, मंडळाचे पदाधिकारी यांना दि. १४ आॅगस्ट २००७ ला तळेगाव विश्राम भवनावर उपस्थित राहण्याचे आदेश जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दिले. प्रत्यक्षात येथे कोणी अधिकारी उपस्थित नव्हते. याला बराच कालावधी लोटून गेल्यावर पुन्हा लोकशाही दिनात तक्रार दाखल करण्यात आली. शेतकऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या तारखेप्रमाणे जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग आर्वी येथेही हजेरी लावली. मात्र उपविभागीय अभियंत्याने सतत गैरहजर राहून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रकार केला. हक्काचा मोबदला मिळाला नसल्याने पर्यायी शेती घेता आली नाही. नोकऱ्याही मिळाल्या नाही. त्यामुळे संसार उघड्यावर आला आहे. रवींद्र शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रल्हाद आनंदराव केचे यांनी आतापर्यंत दोन डझन तक्रारी वरिष्ठांना दिल्या आहे. यावर कार्यवाही झाली नाही. गेल्या २१ वर्षापासून संपादित जमिनीच्या मोबदल्यातही शेतकऱ्यांना वारंवार शासकीय कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत असल्याने अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत खेळ मांडल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला. याप्रकरणी जि.प. बांधकाम उपविभागाचे उपअभियंता अनिल भडांगे यांना विचारणा केली असता त्यांनी प्रकरण जुने असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांच्या बेताल कारभाराचा फटका बसल्याने शेतकऱ्यांनी उपोषणाचा इशारा दिला. जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांना लेखी तक्रार दिली.