शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

नगरपालिकेच्या तिजोरीत दीड कोटी रुपयांची तूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 05:00 IST

मार्च हा सर्वच शासकीय कार्यालयांकरिता आर्थिक ताळेबंदीचा महत्त्वपूर्ण महिना असतो. या कालावधीत शासकीय, निमशासकीय कार्यालयांचे उशिरापर्यंत कामकाज चालते. सर्वत्र ताळेबंदीची धावपळ दिसून येते. यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊनसह संचारबंदीची घोषणा करण्यात आली. वर्धा जिल्ह्यात २२ मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर २३ पासून आठ दिवस आणि नंतर चार टप्प्यात लॉकडाऊन करण्यात आले.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा फटका : साडेसात कोटी रुपये कर वसूल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना विषाणू संक्रमण रोखण्याकरिता असलेल्या लॉकडाऊनमुळे यंदा मालमत्ता करवसुलीत नगरपालिकेला नियोजित ९ कोटींच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचता आले नाही. त्यामुळे तिजोरीत दीड कोटी रुपयांची तूट पडली.मार्च हा सर्वच शासकीय कार्यालयांकरिता आर्थिक ताळेबंदीचा महत्त्वपूर्ण महिना असतो. या कालावधीत शासकीय, निमशासकीय कार्यालयांचे उशिरापर्यंत कामकाज चालते. सर्वत्र ताळेबंदीची धावपळ दिसून येते. यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात देशभरात लॉकडाऊनसह संचारबंदीची घोषणा करण्यात आली. वर्धा जिल्ह्यात २२ मार्चच्या जनता कर्फ्यूनंतर २३ पासून आठ दिवस आणि नंतर चार टप्प्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे बाजारपेठेतील सर्वच व्यवसाय ठप्प होते. बाजारपेठेतील कापड, सराफा, जनरल व इतर वस्तू विक्रीची दुकानेही बंद होती. या काळात नगरपालिकेचे करवसुलीचे कामही ठप्प होते. पालिकेची यंत्रणा कोविड-१९ मध्येच व्यस्त होती.अनेक जण नगरपालिका कार्यालयात कराचा भरणा करतात. मात्र, प्रशासनाने ‘घरीच रहा, सुरक्षित रहा’ असे आवाहन केल्याने नागरिकांनीही त्याला प्रतिसाद दिला. त्यामुळेही करवसुलीवर परिणाम झाला. वर्धा शहरात एकूण २६ हजार मालमत्ताधारक आहेत. यातील २५ हजार ग्राहकांकडून कराचा नियमित भरणा केला जातो. नगरपालिकेला यंदा मालमत्ता करवसुलीचे ९ कोटींचे उद्दिष्ट होते.करवसुलीतून पालिकेला कोट्यवधींचे उत्पन्न मिळते. जुलै महिन्यापर्यंत पालिकेकडून ७ कोटी ५० हजार रुपये करवसुली करण्यात आली. मात्र, लॉकडाऊनमुळे मार्च एन्डिंगच्या अखेरच्या दिवसांत दीड कोटींच्या मालमत्ता करापासून नगरपालिकेला मुकावे लागले. गतवर्षी २०१८-१९ मध्ये मालमत्ता करापोटी ७ कोटी ५० हजार रुपये इतके वसुली झाली होती. यावेळी मात्र, कोरोना विषाणू संक्रमणाचा करवसुलीला फटका बसला. लॉकडाऊनकाळात सर्व काही ठप्प असल्याने अनेकांचे रोजगार हिरावले गेले.परिणामी, त्यांच्यावर उपासमारीचे संकट ओढवले. लॉकडाऊन काळात विजेचे देयकही भरमसाठ आले. उत्पन्नाचे स्रोतच बंद असल्याने विजेचे देयक आणि मालमत्ता कराचा भरणा कसा करावा, असा प्रश्न अनेकांपुढे उभा ठाकला आहे. या कारणामुळेही मालमत्ता करवसुलीत नगरपालिकेला उद्दिष्ट गाठता आले नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याTaxकर