दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

By Admin | Updated: September 25, 2016 02:05 IST2016-09-25T02:05:14+5:302016-09-25T02:05:14+5:30

समोरून येत असलेल्या बसची आपल्याला धडक बसेल, या भीतीने वळणरस्त्यावर ुदुचाकी घसरून अपघात झाला.

The death of the youth in a two-wheeler accident | दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

आष्टी (शहीद) : समोरून येत असलेल्या बसची आपल्याला धडक बसेल, या भीतीने वळणरस्त्यावर ुदुचाकी घसरून अपघात झाला. यात दुचाकीवर बसलेल्या युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी बेलोरा गावाजवळ घडली. निळकंठ जोगे (३५) असे मृतकाचे नाव आहे.
हिंगणघाट-मोर्शी बस सकाळी मोर्शीकडे जात होती. यावेळी निळकंठ जोगे हा मित्रासोबत दुचाकीने मोर्शीवरून खंबीतला येत होता. सदर दुचाकी विनोद खोडे चालवित होते. निळकंठ जोगे मागे बसला होता; मात्र बस येताच दचकल्याने तोल सुटल्याने दुचाकीवरून त्याने उडी मारली. यात तो जागीच पडला. यात त्याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. यावेळी बसचालकाने आपली काहीही चूक नसल्याचे दाखविण्याकरिता १५ नागरिकांच्या स्वाक्षऱ्या घेवून बस पुढच्या प्रवासाला नेली. निळकंठ याची परिस्थिती हालाखीची असून त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे.(तालुका प्रतिनिधी)

Web Title: The death of the youth in a two-wheeler accident