शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST

पावसाचे पाणी शेतात साचल्याने शेतशिवार जलमय झाले आहे. तर नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. नाल्याचा पूर शेतातून गेल्याने उभी पीक धाराशाही झाली. तर घरांचीही पडझड झाली आहे. अतिवृष्टीमुळे कपाशीची पाने पिवळी पडत असून पानगळ सुरू झाली आहे.

ठळक मुद्देघरांचीही पडझड। शासकीय मदतीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : गेल्या काही दिवसांपासून पावसाची दररोज हजेरी सुरू आहे. सततच्या पाऊस आता शेतीपिकांना नकोसा झाला आहे. पावसाने आता काही दिवसांची उसंत द्यावी असे शेतकऱ्यांना वाटत असताना दीड तास झालेल्या पावसामुळे अनेक शेताला तळ्याचे स्वरूप आले आहे. शिवाय काही घरांची पडझड झाली असून नुकसानग्रस्तांना शासकीय मदतीची प्रतीक्षा आहे.पावसाचे पाणी शेतात साचल्याने शेतशिवार जलमय झाले आहे. तर नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. नाल्याचा पूर शेतातून गेल्याने उभी पीक धाराशाही झाली. तर घरांचीही पडझड झाली आहे. अतिवृष्टीमुळे कपाशीची पाने पिवळी पडत असून पानगळ सुरू झाली आहे.शिवाय सोयाबीनच्या शेंगाची गळती सुरू झाल्याचे शेतकरी सांगतात. तुरीच्या झाडांचे पान गळत असून शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. येथील शेतकरी रमेश कोपटकर यांचे मौजा केळझर येथे शेत आहे. त्या शेताला लागूनच मोठा नाला आहे. पावसामुळे या नाल्याला पूर आला. शिवाय पुराचे पाण्याने शेतातून वाट काढल्याने त्यांच्या शेतातील उभी पीक धाराशाही झाली. शिवाय शेतातील मातीही वाहून गेली. यामुळे यांचे मोठे नुकसान झाले आहे.तसेच येथील वॉर्ड क्र.१ मधील सुरेश जगन दातीर यांचे घर कोसळले. या घरात कुणीच राहात नसल्याने जीवितहानी टळली. सदर नुकसानग्रस्तांना जिल्हा प्रशासनाकडून तातडीने शासकीय मदतीची अपेक्षा आहे.

टॅग्स :Rainपाऊस