शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव विद्युत देयकाच्या विरोधात जनसमुदाय रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:00 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनच्या सुरूवातीला तीन महिने सर्व जनता शासनाच्या सूचनांचे पालन करून घरीच होती. इतकेच नव्हे तर अनेक कारखाने, छोटे-मोठे व लघु उद्योगातील काम ठप्प झाले होते. अशातच अनेक कामगारांसह कष्टकऱ्यांचा रोजगार हिरावल्या गेला. अजूनही परिस्थिती पाहिजे तशी बरी झालेली नाही. अशा परिस्थितीतही महावितरणने माहे मार्च ते मे महिन्यात मोठे विद्युत देयक नागरिकांना दिले आहे.

ठळक मुद्देरस्तारोको आंदोलनातून वेधले लक्ष : आंदोलनकर्त्यांची अटक व सुटका, तीन महिन्यांचे देयक माफ करण्याची रेटली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. पण याच काळात महावितरणने सर्वसामान्य नागरिकांना वाढीव विद्युत देयक दिले. या प्रकरणी योग्य कार्यवाही करण्यात यावी. शिवाय समाजातील दुर्बल घटकांचे विद्युत देयक माफ करण्यात यावे, अशी मागणी संबंधितांना निवेदनातून करण्यात आली. पण त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने बुधवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्त्वात रास्तारोको आंदोलन करून या विषयाकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. लॉकडाऊनच्या सुरूवातीला तीन महिने सर्व जनता शासनाच्या सूचनांचे पालन करून घरीच होती. इतकेच नव्हे तर अनेक कारखाने, छोटे-मोठे व लघु उद्योगातील काम ठप्प झाले होते. अशातच अनेक कामगारांसह कष्टकऱ्यांचा रोजगार हिरावल्या गेला. अजूनही परिस्थिती पाहिजे तशी बरी झालेली नाही. अशा परिस्थितीतही महावितरणने माहे मार्च ते मे महिन्यात मोठे विद्युत देयक नागरिकांना दिले आहे. या तीन महिन्यातील विद्युत देयक माफ करण्यात यावे, अशी मागणी संबंधितांकडे मनसेच्यावतीने वेळोवेळी निवेदन देऊन करण्यात आली. मात्र, राज्य सरकारकडून यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही. शिवाय मागणी जैसे थेच आहे. परिणामी, बुधवारी नागरिकांना सोबत घेऊन मनसेच्यावतीने हिंगणघाट येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिसांनी आंदोलनस्थळ गाठून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेत त्यांना अटक केली. पण काही वेळानंतर या आंदोलनकर्त्यांची सुटका करण्यात आली. तीन महिन्याचे विद्युत देयक राज्य शासनाने माफ करावे अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून रेटण्यात आली. आंदोलनात अमोल बोरकर, सुनील भुते, सुभाष चौधरी, रमेश घंगारे, राहुल सोरटे, किशोर चांभारे, नीता गजभे, संगीता घंगारे, मारोती महाकाळकर, उमेश नेवारे, जगदीश वांदिले, किशोर भजभुजे, राजू सिन्हा, जयंत कातरकर, मनोज गिरडे, गजु चिडे, कवडु ब्राह्मणे, नीलेश खाटीक, अनिकेत हिवाळे, वासुदेव वैरागडे, प्रशांत एकोणकार, अमोल मेढुले, गोमाजी मोरे, सुधाकर वाढई, प्रल्हाद तुळाले, भोला इंगोले, शेखर ठाकरे, रुपेश चंदनखेडे, सुनील खेकारे आदी सहभागी झाले होते.विद्युत जोडणी कापल्यास तीव्र आंदोलनलॉकडाऊनच्या काळातील वाढून आलेले तीन महिन्याचे विद्युत देयक सरसकट माफ करा अशी आमची रास्त मागणी आहे. पण वारंवार निवेदन देऊनही मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेकांचे रोजगार हिरावल्या गेले. त्यामुळे विद्युत देयक कसे अदा करावे हा त्यांच्यासमोरील मोठा प्रश्न आहे. जर महावितरणने विद्युत देयक न भरणाऱ्या नागरिकांची विद्युत जोडणी कापली तर महावितरणच्या कार्यालयातच मनसे स्टाईलमध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांनी दिला आहे.

टॅग्स :electricityवीज