शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

आरटीईचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी कार्यवाही

By admin | Updated: May 1, 2016 02:14 IST

आरटीई कायद्यानुसार एक किमीच्या आत पाचवी व तीन किमीच्या आत इयत्ता आठवीचे वर्ग दुसऱ्या शाळेला देता येत नाही;

प्रशासनाला निवेदन : मुख्याध्यापक संघाचा इशारावर्धा : आरटीई कायद्यानुसार एक किमीच्या आत पाचवी व तीन किमीच्या आत इयत्ता आठवीचे वर्ग दुसऱ्या शाळेला देता येत नाही; पण शासन मान्यतेनुसार अनेक खासगी माध्यमिक शाळा सुरू आहेत. कोणतेही लेखी आदेश नसताना, अंतराच्या निकषात न बसणाऱ्या शाळांत पाचवी व आठवीचे वर्ग सुरू करणाऱ्या संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक व व्यवस्थापनावर फौजदारी कार्यवाही करण्याचा इशारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्यात.जि.प. शाळांनी सरसकट पाचवी व आठवी जोडण्याचा सपाटा सुरू केला. यामुळे शिक्षणाचा अधिकार कायद्याचे सर्रास उल्लंघन होत आहे. अशा शाळा व मुख्याध्यापकांवर नियम कलम १८(५) नुसार एक लाख आणि प्रतिदिवस १० हजार रुपये दंड आणि फौजदारी कार्यवाहीचे प्रावधान आहे. अशा शाळांनी कोणत्याही विद्यार्थ्यांचा दाखला रोखून धरल्यास निकालानंतर प्रतिदिवस १० हजार रुपये प्रतिविद्यार्थी प्रमाणे दंडात्मक कार्यवाहीचे निकष आहे. जिल्ह्यात या आरटीई कायद्याला पायदळी तुडवून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत विनापरवानगीने, नियम धाब्यावर बसविणाऱ्या मुख्याध्यापकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात कसूर केला जाणार नाही. याबाबत शिक्षक, मुख्याध्यापक संघटना आक्रमक झाल्या असून प्रखर विरोध करणार असल्याचे मुख्या. संघाचे जिल्हा सचिव सतीश जगताप यांनी कळविले आहे.(प्रतिनिधी)