शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुक्तीचे द्विशतक पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 05:00 IST

बुधवारी एकूण २१५ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यापैकी १३ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. तर कोविड चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने कोविड केअर सेंटरमधून २१८ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. शिवाय २३७ संशयीत व्यक्तीच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत कोविड चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

ठळक मुद्देएकाच दिवशी आढळले १३ रुग्ण : २१५ व्यक्तींचे अहवाल प्राप्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : बुधवारी १३ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी १६ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण २१२ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तशी नोंदही आरोग्य विभागाने घेतली आहे.बुधवारी एकूण २१५ व्यक्तींचा कोविड चाचणी अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला. त्यापैकी १३ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. तर कोविड चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याने कोविड केअर सेंटरमधून २१८ व्यक्तींना सुटी देण्यात आली आहे. शिवाय २३७ संशयीत व्यक्तीच्या घशातील द्रवाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत कोविड चाचणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत ९ हजार ४०३ व्यक्तींची कोविड चाचणी करण्यात आली असून त्यापैकी १५९ व्यक्तींच्या अहवालाची प्रतीक्षा आरोग्य विभागाला आहे. तर सध्या २९२ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात असल्याचे सांगण्यात आले. प्रत्येक व्यक्तीने स्वत:ला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्कचा वापर तसेच विनाकारण गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळले पाहिजे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.सावंगीच्या रुग्णालयाचे शतक पूर्णवर्धा : सावंगी (मेघे) येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था संचालित आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या कोविड वॉर्डात भरती होऊन व उपचार घेऊन घरी परतलेल्या रुग्णांचे शतक पूर्ण झाले आहे. सावंगी मेघे रुग्णालयातून बुधवारी पाच रुग्णांना सुटी देण्यात आली. त्यात बुटीबोरी, पुलगाव, बोरगाव व वर्धा येथील रुग्णांसह निमगाव (सबाने) येथील ७५ वर्षीय रुग्णालाही सुदृढ आरोग्याची सदिच्छा देत निरोप देण्यात आला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. पुरुषोत्तम मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, सावंगी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर, विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल शिंदे, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, प्रशासकीय अधिकारी राजेश सव्वालाखे, नर्सिंग संचालक सिस्टर टेसी सबास्टीयन, अधिपरिचारिका माधुरी ढोरे, कोविड वॉर्ड इंचार्ज विशाखा हिवरकर, मुख्य वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ते अजय ठाकरे, सुशांत वानखेडे तसेच डॉक्टर व परिचारिकांची उपस्थिती होती. सध्या २८ कोरोनाबाधित व्यक्ती सावंगी रुग्णालयात उपचार घेत असून आजतागायत १०३ रुग्ण सुखरूप घरी परतले आहेत. जिल्ह्यात कोविड रुग्णांची संख्या वाढत असली तरी कोरोनाबाधितांना दिलासा देण्यासाठी जिल्ह्यातील अद्यावत आरोग्यसेवा सातत्याने प्रयत्नशील आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या