शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

‘एचक्यू’वरच राहणार जिल्ह्यात कोरोनाची भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 05:00 IST

गृहविलगीकरणात असलेल्या लोकांमध्ये कोरोनाचे लक्षण दिसून आल्यास आणि ते कोरोना पॉझिटिव्ह आल्यास वर्धा जिल्ह्याची रुग्ण संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. केंद्र व राज्य सरकारने ग्रीन तसेच ऑरेंज झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांसाठी काही सवलती लागू केल्या आहेत. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू आहेत.

ठळक मुद्देआठ हजारांवर पोहोचली होम क्वारंटाईन व्यक्तींची संख्या

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ग्रीन झोन मध्ये असलेल्या वर्धा जिल्ह्यात गेल्या अठरा दिवसात सात कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहे. यातील चार रुग्ण जिल्ह्यातील असून तिघे जिल्ह्याबाहेरील आहेत. आता जिल्ह्यात परप्रांत व बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांचा मोठा लोंढा दररोज वाढत आहे. त्यामुळे गृहविलगीकरणात असलेल्यांची संख्या ८ हजार १२४ झाली आहे. यात अनेक व्यक्ती परवानगी घेऊन व काही चोरट्या मार्गाने जिल्ह्यात दाखल झालेले आहे. रेड झोनमध्ये असलेल्या देशभरातील विविध ठिकाणावरून ही मंडळी आलेली असल्याने यांच्या १४ दिवसाच्या वास्तव्यावरच आता वर्धा जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती अवलंबुन राहणार आहे.गृहविलगीकरणात असलेल्या लोकांमध्ये कोरोनाचे लक्षण दिसून आल्यास आणि ते कोरोना पॉझिटिव्ह आल्यास वर्धा जिल्ह्याची रुग्ण संख्या वाढण्याची दाट शक्यता आहे. केंद्र व राज्य सरकारने ग्रीन तसेच ऑरेंज झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यांसाठी काही सवलती लागू केल्या आहेत. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात सकाळी ७ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू आहेत. त्याच बरोबर मे महिन्यापर्यंत एकही रुग्ण नसलेल्या वर्धा जिल्ह्यात १८ दिवसांत सात रुग्ण आढळून आले आहेत. सुरूवातील बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्यांचे प्रमाण कमी होते. मात्र, मे महिन्यानंतर अनेकांनी स्वगावाची वाट धरल्याने आता प्रत्येक गावात बाहेर जिल्ह्यातून दाखल होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. १९ मे पर्यंत वर्धा जिल्ह्यात ८ हजार १२४ नागरिक आले असून त्यांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. यामध्ये वर्धा तालुक्यात २ हजार १८६, सेलू तालुक्यात ८७१, देवळी तालुक्यात ७२६, आर्वी तालुक्यात १०२२, आष्टी तालुक्यात ८९५, कारंजा तालुक्यात १२४, समुद्रपूर तालुक्यात ६१० आणि हिंगणघाट तालुक्यात १ हजार ६९० नागरिकांचा समावेश आहे.गृह विलगीकरणातूनच अहवाल आला ‘पॉझिटीव्ह’नवी मुंबई येथून आर्वी तालुक्यातील जामखुटा या गावात दाखल झालेल्या चार व्यक्तींना आरोग्य प्रशासनाने संस्थात्मक विलगीकरणात ठेवले होते. त्यापैकी तिघांचे स्वॅब कोरोना पॉझिटीव्ह आल्याने त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून सेवाग्राम येथील कोविड रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ८ हजारांवर नागरिक आपआपल्या घरी विलगीकरणात असले तरी ते रेड झोन मधून आले असल्याने त्यांच्यातील लक्षणे १४ दिवसानंतरच स्पष्ट होतात. त्यामुळे त्यांच्यावरच आता वर्धा जिल्ह्यातील कोरोना अस्तित्व अवलंबुन आहे. आपल्याला भीती नाही असे म्हणून चालणार नाही. वर्धा जिल्ह्यात येणाऱ्यांची संख्या आणखी ५ ते ७ हजारांनी वाढण्याची शक्यता असून विदेशातूनही दोन नागरिक जिल्ह्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रभाव वर्धा जिल्ह्यात कायमही राहू शकतो.म्हणूनच १० हजाराच्या दंडाची तरतूदवर्धा जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, येथे रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गृह विलगीकरणावर भर देत त्यासाठीची विशेष रणनीती आखून त्यावर अंमलबजावणी करण्याचे निश्चित केले आहे. कुटुंब क्वारंटाईन सध्या केले जात आहे. शिवाय गृहविलगीकरणाचा नियम तोडणाऱ्या व्यक्ती व त्याच्या कुटुंबींयांना १० हजार रुपयांचा दंड व फौजदारी कारवाई करण्याचे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले आहे. अशी तरतूद करणारा वर्धा हा राज्यातील पहिला जिल्हा ठरू पाहत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या