शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
5
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
6
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
7
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
8
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
9
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
10
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
11
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
12
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
13
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
14
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
15
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
16
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
17
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
18
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
19
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
20
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छता अभियानात मिळणार मूल्यमापनानुसार गुण

By admin | Updated: November 2, 2016 00:40 IST

शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवून राज्यातील अनेक गावांचा चेहरामोहरा बदलला होता.

प्रत्येक ग्रामपंचायतीला राबवावी लागणार स्वच्छग्राम स्पर्धासचिन देवतळे  विरूळ (आकाजी)शासनाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवून राज्यातील अनेक गावांचा चेहरामोहरा बदलला होता. अनेक गावे आरशासारखी स्वच्छता झाली होती; पण आता नव्या शासनाद्वारे स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेसाठी ग्रा.पं.ने केलेल्या मुल्यमापनाचे निकष शासनाने जाहीर केले आहेत. यामुळे प्रत्येक ग्रा.पं. ला या नियमांची जाण ठेवणे गरजेचे आहे.या स्पर्धेत शौचालय व्यवस्थापनाला ४० गुण, सांडपाणी व्यवस्थापनासाठी १० गुण, घनचकरा व्यवस्थापन ५ गुण, पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन २० गुण, घर गाव परिसर स्वच्छतेला ५ गुण, वैयक्तिक स्वच्छता ५ गुण तसेच लोकसहभाग आणि सामूदायिक स्वयं-पुढाकारातून राबविलेल्या नाविण्यपूर्ण उपक्रमाला १० गुण दिले जाणार आहेत.पाणी गुणवत्ता आणि पाणी व्यवस्थापनाला कमाल २० गुण आहेत. यामध्ये पाणी पुरवठा योजना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असल्यास आणि पाणी पट्टी वसुलीचे प्रमाण १०० टक्के असल्यास दोन गुण मिळणार आहेत. ग्रामपंचायतीकडे स्व-निर्मिती आणि सुरक्षितता आराखडा असल्यास दोन गुण, गावात पाणी पुरवठा योजनेतून दिलेल्या घरगुती नळ जोडण्यांची संख्या ९१ ते १०० टक्के असल्यास दोन गुण मिळणार आहेत. गावातील एकूण सर्व पाणी पुरवठ्याच्या सुविधांमधून कुठेही पाणी गळती नसल्यास दोन गुण, ९९ टक्केच्या खाली असल्यास एक गुण देण्यात येणार आहे.वैयक्तिक स्वच्छतेसाठी पाच गुण ठेवण्यात आले आहेत. यात विद्यार्थ्यांना आरोग्याच्या योग्य सवई, नागरिकांच्या योग्य सवईसाठी गुण दिले जाणार आहेत. शिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याचे प्रकार नसणे यावर गुण दिले जाणार आहेत. लोकसहभागातून नाविण्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी तसेच गावात गत पाच वर्षांत जातीय दंगल न झाल्यास, गावात अतिक्रमण नसल्यास यावरही योग्य गुण दिले जाणार असल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. गावासाठी आणि गावाच्या स्वच्छतेसाठी शासनाने हाती घेतलेला हा उपक्रम अतिशय चांगला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने जर स्वच्छ अभियान स्पर्धा मन लावून आणि कोणतेही राजकीय मतभेद न ठेवता राबविली तर प्रत्येक गाव आरोग्य संपन्न होईल, हे निश्चित!