पुलगावच्या पंचधारा मार्गावरील नालीची साफसफाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 05:00 IST2020-03-22T05:00:00+5:302020-03-22T05:00:18+5:30

पुलगाव येथील बढे प्लॉट परिसरात असलेल्या पंचधारा रस्त्यालगत सांडपाणी वाहून नेणारी नाली आहे. सदर नालीची मागील सहा ते सात वर्षांपासून साफसफाई न केल्याने नालीत घाण साचली आहे. नालीतील पाण्यात किडे, अळ्या पडल्या असून सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. नालीला लागुनच डॉ. बोरटकर, डॉ. बागडे यांच्यासह अनेक नागरिकांची घरे आहेत.

Clean the drain on Pulgaon's five-way stretch | पुलगावच्या पंचधारा मार्गावरील नालीची साफसफाई करा

पुलगावच्या पंचधारा मार्गावरील नालीची साफसफाई करा

ठळक मुद्देबढे प्लॉट परिसरातील नागरिकांची मागणी । निधीअभावी रखडले काम

लोकमत न्यूज नेटवर्क
नाचणगाव : सर्वत्र कोरोना आजाराने थैमान घातले असताना प्रशासनाकडून स्वच्छता पाळण्याबाबतचे आदेश निर्गमीत केले आहे. पण, पुलगाव येथील बढे प्लॉट परिसरातील पंचधारा मार्गावर असलेल्या नालीची मागील अनेक वर्षांपासून साफसफाईच केल्या गेली नसल्याने नालीतून गटारगंगा वाहत आहे. लगतच्या काही घरमालकांनी ही बाब न.प. प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यावरही नगरसेवकांकडून दुर्लक्ष केल्या जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.
पुलगाव येथील बढे प्लॉट परिसरात असलेल्या पंचधारा रस्त्यालगत सांडपाणी वाहून नेणारी नाली आहे. सदर नालीची मागील सहा ते सात वर्षांपासून साफसफाई न केल्याने नालीत घाण साचली आहे. नालीतील पाण्यात किडे, अळ्या पडल्या असून सर्वत्र दुर्गंधी पसरलेली आहे. नालीला लागुनच डॉ. बोरटकर, डॉ. बागडे यांच्यासह अनेक नागरिकांची घरे आहेत. परिसरात नेहमी दुर्गंधी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काहींनी तर नालीवर अतिक्रमण करीत नाली बुजवून त्यावर पक्के बांधकाम केले आहे. त्यामुळे नालीतून पाणी व कचरा वाहून जात नाही. परिणामी नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
याबाबत नगरसेवकासह नगर पालिका प्रशासनाला ही गंभीर बाब निदर्शनास आणून देत नालीची स्वच्छता करण्याची मागणी केली असता तुम्हीच नाली बुजवून टाका, असा उलट सल्ला त्यांच्याकडून देण्यात आला. नगरपालिका प्रशासनाने नालीवरील सर्व अतिक्रमणे काढून नाली स्वच्छ करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

आरोग्याचा धोका
नालीतील कचरा व पाणी वाहून जात नसल्याने सुटलेल्या दुर्गंधीने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

Web Title: Clean the drain on Pulgaon's five-way stretch