शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वर्ध्यात चिन्ना बारींनी फडकावला होता तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:00 IST

लोकांनी अनेक राज्यात पर्यायी व्यवस्था स्थापून अनेक गाव व शहरामध्ये पर्यायी व्यवस्था निर्माण झाली. वर्धा जिल्ह्यातील आष्टी (शहीद) चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे पोलीस ठाणे व शासकीय इमारतींवर सत्ता काबीज केली. देशातील अनेक जिल्ह्यात सरकारी इमारती व जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरंगा चढवून ध्वजारोहण करण्यात आले.

ठळक मुद्देऑगस्ट क्रांतिदिन विशेष । वयोवृद्ध नामदेवरावांनी जागविल्या स्मृती

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देशात स्वातंत्र्यलढ्याचे आंदोलन चिघळले असतानाच वर्ध्यात चिन्ना बारी यांनी आपल्या सवंगड्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर चढत तिरंगा फडकावला. ९ ऑगस्ट रोजी वर्ध्यात ही अनोखी क्रांती घडली. या क्रांतिदिनाच्या स्मृतींना ज्येष्ठ नागरिक नामदेवराव गुजरकर यांनी उजाळा दिला.महात्मा गांधींनी ८ ऑगस्ट १९४२ मध्ये ब्रिटिशांना भारतातून चालते व्हा, असे खडसावत देशवासीयांना करा किंवा मरा, असे सांगितले. मात्र, ब्रिटिशांनी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी महात्मा गांधी जवाहरलाल नेहरू व इतर ज्येष्ठ नेत्यांना कारागृहात टाकले. दुसरी फळी जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, सुचेता कृपलानी, अरुणा असफली, उषा मेहता आदी नेत्यांनी भूमिगत होऊन गावागावांत आणि देशाच्या कानाकोपऱ्यात करा किंवा मरा या मोहिमेद्वारे जागृती केली. ९ ऑगस्ट १९४२ ला पहाटेपासूनच विद्यार्थी, युवक, महिला, व्यापारी, कामगार आदी सर्वांनी रेल्वेगाड्या बंद पाडल्या. टेलिग्राफ टॉवर पाडण्यात आले. प्रक्षुब्ध लोकांनी बँक, ट्रेझरी, पोलीस चौक्यावर धावा बोलून ताब्यात घेतल्या. ब्रिटिश अधिकाऱ्यांची कार्यालये, त्यांची संपत्तीही हस्तगत केली. सातत आत-आठ दिवस सेशात ही मोहीम सुरू होती. ब्रिटिशांनी पोलीस व सैन्याचा वापर करून लाखो लोकांना कारागृहात डांबले. ऑपरेशन बोल्टनुसार भारतात सर्व ठिकाणी गोळीबार केला. यात १० हजार सैनिक शहीद झाले. संपूर्ण देशातील वातावरण विस्कळीत झाले.लोकांनी अनेक राज्यात पर्यायी व्यवस्था स्थापून अनेक गाव व शहरामध्ये पर्यायी व्यवस्था निर्माण झाली. वर्धा जिल्ह्यातील आष्टी (शहीद) चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे पोलीस ठाणे व शासकीय इमारतींवर सत्ता काबीज केली. देशातील अनेक जिल्ह्यात सरकारी इमारती व जिल्हाधिकारी कार्यालयावर तिरंगा चढवून ध्वजारोहण करण्यात आले. वर्ध्यात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस चिन्ना बारी व त्याच्या तीन-चार सवंगड्यांनी सैन्य आणि पोलिसांची नजर चुकवून लोखंडी खांबावर चढत तिरंगा फडकाविला, ‘भारत माता की जय’ म्हणत हे सर्व जण पसार झाले. या युवकांच्या आवाजाने सैनिकांनी बाहेर येऊन पाहिले तेव्हा तिरंगा झेंडा फडकलेला दिसला. यावरूनच बाजारपेठेकडे जाणाºया एका मार्गाचे ‘चिण्णा बारी मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. वयोवृद्ध नामदेवराव गुजरकर यांनी ‘लोकमत’कडे क्रांतिदिनाच्या या स्मृतींना उजाळा दिला.