शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षांच्या भडिमाराने हिरावला चिमुकल्यांचा ‘बालहक्क’

By admin | Updated: November 19, 2014 22:45 IST

मुलांवर होणारे शारीरिक, मानसिक अत्याचार व माध्यमांद्वारे दाखविल्या जाणाऱ्या काही बाबींमुळे मुलांचे भावविश्व बदलत आहे. त्यांच्यावर अपेक्षांचा भडिमार होत असताना त्यांचे बालपण व पर्यायाने

पराग मगर - वर्धामुलांवर होणारे शारीरिक, मानसिक अत्याचार व माध्यमांद्वारे दाखविल्या जाणाऱ्या काही बाबींमुळे मुलांचे भावविश्व बदलत आहे. त्यांच्यावर अपेक्षांचा भडिमार होत असताना त्यांचे बालपण व पर्यायाने त्यांचे हक्क हिरावले जात आहे. यामुळे मुलांचे हक्क, कर्तव्ये व अधिकार यावर नव्याने विचार करण्याची वेळ आली आहे. महिला व बालकल्याण विभागाद्वारे बालकांसाठी अनेक योजना राबविल्या जातात़ त्यांच्या अधिकारांबाबत चर्चा होत आहे; पण मुलांचे अधिकार आधी मुलांना कळणे गरजेचे आहे. याबाबत बालहक्कदिनी घेतलेला धांडोळा़़़मानवाधिकार, नागरी हक्क, ग्राहकांचा हक्क, महिलांना हक्क असे अनेक विषय सध्या चर्चिले जातात. जगात लोकसंख्येच्या १५ टक्के लोकसंख्या ही बालकांची आहे. तरीही बालकांचा हक्क या विषयाकडे सहज दुर्लक्ष केले जाते़ मुळात बालकांना गृहितच धरले जात असल्याने हा प्रकार होतो; पण युनिसेफ व इतरही संस्थांचे कार्य तसेच बालकांवर होत असलेले अत्याचार व त्यांचे बदलते आयुष्य यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने १९८९ मध्ये पुढाकार घेऊन बालहक्काचा करार मांडला. तेव्हापासून बालहक्कावर संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. या करारात एकूण ५४ कलमे अंतर्निहित असून अस्तित्व, संरक्षण, विकास आणि सहभाग या चार हक्कांमध्ये त्यांचा समावेश आहे. घरांमध्ये मुलगा-मुलगी असा भेद काही अंशी कमी झाला असला तरी त्यांना गृहित धरण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यांचाही घरच्या निर्णयात काहीसा सहभाग असावा, ही बाबच न रूजल्याने महिला व बाल कल्याण विभागामार्फत बालकांचे हक्क, त्यांच्यासाठी असलेल्या योजना आदी माहिती सर्वांपर्यंत पोहोचविली जाते. यासाठी सन २००० पासून बाल न्याय अधिनियमही तयार करण्यात आला़ आजची मुले उद्याचे नागरिक आहे, या दृष्टीने विचार व्हावा यासाठी बालविकास विभागाद्वारे प्रयत्नही होत आहे; पण मुलांना हक्काप्रती जागरुक होण्यासाठी बोलतं करणे व हक्काप्रती जागरुक करणे गरजेचे आहे़