शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

हवामान बदलताच शेतकऱ्यांची लगबग सुरू

By admin | Updated: June 13, 2014 00:22 IST

रोहिणी नक्षत्रात पारा वाढतच गेल्याने शेतकामाला खिळ बसली होती. मृग नक्षत्राची छाया पडताच हवामानात झालेला बदल पाहता पुन्हा खरीपाची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी त्याच्या कामात पुन्हा व्यस्त झाला आाहे.

घोराड : रोहिणी नक्षत्रात पारा वाढतच गेल्याने शेतकामाला खिळ बसली होती. मृग नक्षत्राची छाया पडताच हवामानात झालेला बदल पाहता पुन्हा खरीपाची लगबग सुरू झाली आहे. शेतकरी त्याच्या कामात पुन्हा व्यस्त झाला आाहे. त्याला आता एका जोमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

गत दोन वर्षात अस्माणी संकटाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जरजर केले. रब्बी हंगामात आलेल्या गारपीटीने शेतातील पिकाचे होत्याचे नव्हते केले. शेतकऱ्यांवर सातत्याने असलेले आर्थिक मंदिचे सावट पाहता या वर्षीच्या खरीप हंगामाला सामोरे जातांना अनेक आर्थिक अडचणी येत आहे.

उन्हाळवाहीची कामे पूर्ण झाली असून काही शेतकऱ्यांनी मान्सूनपूर्व पेरणी केली आहे. तुषार सिंचन व ठिंबक सिंचनाचा सहारा घेतला असताना कपाशीचे डोबण झाले आहे. अशात भारनियमनाचा कालावधी वाढत असल्याने त्यांना विविध संकटांचा सामना करावा लागत आहे. अवेळी होत असलेल्या भारनियमनामुळे त्यांना पिकांनी पाणी देणे शक्य होत नसल्याने उमललेली रोपे वाढत्या पाऱ्याने करपण्याची वेळ आली आहे.

रखरखत्या उन्हामुळे रोहीणी नक्षत्रात होणारी कापूस लागवड दरवर्षी पेक्षा यावर्षीच्या हंगामात कमी प्रमाणात दिसून येते. जूनच्या ८ तारखेपासून मृग नक्षत्राला हत्ती वाहन घेवून सुरुवात झाली. या नक्षत्रात पाऊस येतोच असा शेतकऱ्यांचा पक्का समज आहे. गत दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण दिसू लागल्याने शेतकऱ्यांनी बियाण्याच्या खरेदीसाठी लगबग सुरू केली आहे. पांदण रस्त्याची दुरवस्था पाहता पावसाळ्याच्या दिवसात शेतात बैलबंडी जात नाही अशा शेतकऱ्यांनी शेतात असलेल्या गोठ्यावर रासायनिक खत सुरक्षीत ठेवण्यासाठी खताची खरेदी मोठ्या प्रमाणात केली खरेदी केली आहे. अशात त्यांच्यासमोर असलेल्या अडचणी अजूनही कायम आहेच.(वार्ताहर)