शहरं
Join us  
Trending Stories
1
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
4
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
5
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
6
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
7
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
8
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
9
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
10
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
11
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
12
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
13
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
14
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
15
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
16
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
17
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
18
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
19
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
20
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
Daily Top 2Weekly Top 5

बापूंच्या आश्रमावर राहणार सीसीटीव्हीची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 05:00 IST

महात्मा गांधीचे १० वर्ष वास्तव्य राहिलेले सेवाग्राम आश्रम जागतिक पर्यटन स्थळ आहे. देश विदेशातील पर्यटक, अभ्यासक येथे येतात. आश्रम परिसराच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन या परिसराला तब्बल ३२ कॅमेऱ्याचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे. महात्मा गांधी यांचा आश्रम जगात प्रसिद्ध आहे. येथूनच स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करण्यात आले. गांधीनी अकरा व्रतासह अठरा रचनात्मक कार्य देशाला दिली.

ठळक मुद्दे३२ कॅमेरे लावले : चष्मा चोरीनंतर सुरक्षेकडे विशेष लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम : महात्मा गांधीचे १० वर्ष वास्तव्य राहिलेले सेवाग्राम आश्रम जागतिक पर्यटन स्थळ आहे. देश विदेशातील पर्यटक, अभ्यासक येथे येतात. आश्रम परिसराच्या सुरक्षेची बाब लक्षात घेऊन या परिसराला तब्बल ३२ कॅमेऱ्याचे सुरक्षा कवच देण्यात आले आहे.महात्मा गांधी यांचा आश्रम जगात प्रसिद्ध आहे. येथूनच स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करण्यात आले. गांधीनी अकरा व्रतासह अठरा रचनात्मक कार्य देशाला दिली. बापू कुटी आणि कार्यालय या ठिकाणी साहित्य ठेवण्यात आलेले आहे. ते काचेच्या शोकेसमध्ये कुलूप बंद आहेत. बा व बापूचे साहित्य व वस्तू मौल्यवान आहे. पण आश्रमात गार्ड वा बंदुकधारी अशी व्यवस्था करता येत नाही कारण या बाबी आश्रमच्या परंपरेत बसत नाही. बापूंच्या कार्य काळापासून जसे आहेत तसेच ते ठेवण्यासाठी आश्रम कटीबद्ध आहे. पण घटना सांगून होत नाही. चष्मा चोरी प्रकरण झाले आणि साहित्याच्या सुरक्षेचा प्रश्न गाजला. त्यावेळी नव्या आश्रमच्या कार्यकारणीने २०१३ मध्ये अध्यक्ष जयवंत मठकर व मंत्री प्रा.डॉ. श्रीराम जाधव यांनी या बाबत लक्ष घातले. सर्व व्यवस्थेच्या दृष्टीकोनातून आश्रमात सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे. ही काळाची गरज लक्षात घेऊन यासाठी खा. रामदास तडस यांच्याकडे ही बाब मांडली. यावर लगेच त्यांनी होकार देत आश्रम कॅमेºयाच्या देखरेखीखाली आणण्याच्या कामासाठी सहकार्य करण्यास सहमती दर्शविली. आता तब्बल बत्तीस कॅमेरे आश्रमावर लक्ष ठेवून आहे. यात आश्रम परिसर, सर्व स्मारके,रसोडा, गोशाळा, प्रवेश द्वार,कार्यालय आदी ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आल्याने सुरक्षा कवच मजबूत झाले आहे. आता आश्रमात येणाºया प्रत्येक व्यक्तीच्या हालचालीवर नजर ठेवता येणे सहज शक्य होणार आहे. त्यामुळे आश्रमातील दुर्मिळ वस्तूची चोरी होणार नाही.गोशाळा, आहार केंद्रही कॅमेºयाच्या रेंजमध्येसेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान अंतर्गत यात्री निवास आणि आहार केंद्रात नव्याने सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. यामुळे सर्व क्षेत्रावर लक्ष ठेवण्यास सुकर झाले आहे. आज तब्बल बत्तीस कॅमेरे आश्रम व परिसरावर लक्ष ठेवून आहे.यात आश्रम परिसर, सर्व स्मारके, रसोडा, गोशाळा, प्रवेश द्वार, कार्यालय आदी ठिकाणी कॅमेरे लक्ष ठेवून आहे. त्यामुळे आश्रमाचे सुरक्षाकवच तगडे झाले आहे.

टॅग्स :Socialसामाजिक