शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सीसीआयने चांगल्या कापसासाठी खरेदी थांबविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 06:00 IST

सध्या काही ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. परंतु, समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरीही नाराज आहे. शुभारंभाचे मुहूर्तावर येथील जय बजरंग जीनिंग मध्ये एक हजार क्विंटल व संजय इंडस्ट्रीज येथे दोन हजार क्विंटल कापसाची खरेदी करून प्रति क्विंटल ४ हजार ६०० ते ५ हजार १४१ रूपयेपर्यंतचे भाव देण्यात आला.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांच्या भावबाजीमुळे शेतकऱ्यांमध्ये वाढतोय रोष

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : सध्या बाजारात कापूस विक्रीला आला असला तरी यामध्ये ओलाव्याचे प्रमाण असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे जोपर्यंत गुणवत्तापूर्ण कापूस विक्रीला येत नाही तोपर्यंत खरेदीचा मुहूर्त साधला जाणार नसल्याचे सीसीआयचे ग्रेडर सांगत आहेत. कापूस खरेदीबाबत सीसीआयचा हा आडमुठीपणा शेतकऱ्यांच्या अडचणीत भर टाकणारा ठरत असून याचाच फायदा सध्या व्यापारी घेत आहे. इतकेच नव्हे तर व्यापारीही शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा घेत असल्याने सीसीआयने कापूस खरेदी तातडीने सुरू करावी, अशी मागणी आहे.सध्या काही ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात झाली आहे. परंतु, समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरीही नाराज आहे. शुभारंभाचे मुहूर्तावर येथील जय बजरंग जीनिंग मध्ये एक हजार क्विंटल व संजय इंडस्ट्रीज येथे दोन हजार क्विंटल कापसाची खरेदी करून प्रति क्विंटल ४ हजार ६०० ते ५ हजार १४१ रूपयेपर्यंतचे भाव देण्यात आला. सीसीआयचा भाव प्रतिक्विंटल ५ हजार ५५० इतका असून तो खासगी व्यापाऱ्यांच्या तुलनेत जादा आहे. त्यामुळे सीसीआयची खरेदी सुरू झाल्याशिवाय कापसाचे भावात तेजी येणार नसल्याचे बोलले जात आहे. मागील हंगामात शेतकऱ्यांचा बहुतांश कापूस बाजारात विकल्या गेल्यानंतर भावात वाढ झाली. त्याचा जास्तीत जास्त फायदा खासगी व्यापाऱ्यांनाच झाला. यावेळीही या परिसरातील कपाशी उत्पादकांना प्रतिक्विंटल ५ हजार ८०० ते ६ हजार ३०० रूपयेपर्यंतचे भाव मिळाले. व्यापाऱ्यांच्या तुलनेत सीसीआयचे भाव कमी असल्याने सीसीआयच्या कापूस खरेदीला पाठ दाखविण्यात आली होती. त्यावेळी देवळी केंद्रावर खासगी व्यापाऱ्यांकडून पावणे पाच लाख क्विंटल तसेच सीसीआयचेवतीने १९ हजार क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली; पण यावर्षी सततच्या पावसामुळे कापसाच्या हंगामाला उशीरा सुरुवात झाली. त्यातच परतीच्या पावसामुळे कापूस ओला झाला. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी आलेल्या कापसात बऱ्यापैकी आद्रता असल्याचे दिसून येते. याचाच फायदा घेऊन खासगी व्यापाऱ्यांनी कापसाचे भाव पाडले असल्याची चर्चा सध्या शेतकऱ्यांमध्ये होत आहे. सीसीआयच्या लवाजमा याठिकाणी आठ दिवसांपूर्वीच आला असला तरी कापूस खरेदीच्या मुहूर्ताला अजून सुरुवात झालेली नाही, हे विशेष.सीसीआयचे कापूस खरेदीचे भाव प्रति क्विंटल ५ हजार ५५० रूपये आहे. कापसाची गुणवत्ता तपासून भाव देण्यात येणार आहे. कापूस ओला असल्यास दिल्या जाणाऱ्या भावात ८ ते १२ टक्के कपात करणार आहे. जोपर्यंत चांगला कापूस बाजारात विक्रीसाठी येणार नाही, तोपर्यंत सीसीआय खरेदी करणार नाही.- रमेशकुमार बोरवले, ग्रेडर, सीसीआय, देवळी.

टॅग्स :cottonकापूस