शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशांच्या सेवेत घाणेरड्या बसेस

By admin | Updated: August 22, 2016 00:29 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून सुरक्षित प्रवासाची हमी दिली जाते. एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास, हे ब्रीद मिरविले जाते;

दुर्गंधीचा प्रवास : सुरक्षेची हमी राहिली कागदावरचवर्धा : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून सुरक्षित प्रवासाची हमी दिली जाते. एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास, हे ब्रीद मिरविले जाते; पण सध्या एसटीचा प्रवास तापदायक ठरू लागला आहे. महामंडळाच्या बसेस भंगार झाल्या असून प्रवाशांच्या सेवेत अस्वच्छ बसेस असल्याचे दिसून येते. परिणामी, दुर्गंधीचा प्रवास करावा लागत असल्याने प्रवाशांमध्ये असंतोष पसरला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस फेऱ्या करून आल्यानंतर स्वच्छ करणे गरजेचे असते. परिवहन महामंडळाकडे तत्सम यंत्रणा कार्यरत आहे. असे असले तरी बहुतांश बसेस स्वच्छ न करताच पुन्हा प्रवासाकरिता पाठविल्या जातात. परिणामी, प्रवाशांना दुर्गंधीयुक्त वातावरणात बसमध्ये प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे. पुलगाव, आर्वी आणि हिंगणघाट आगारातून सुटणाऱ्या बहुतांश बसेस अस्वच्छ राहत असल्याचेच दिसून येते. पुलगाव आगारातील बसेसमध्ये चालकाच्या ‘कॅबीन’मध्ये खर्रा पन्नी, पाण्याच्या रिकाम्या ‘क्रश’ केलेल्या बाटल्या, बिस्कीटच्या पुड्यांचे ‘रॅपर’ यासह अनेक कचरायुक्त ‘वेस्ट’ साहित्य दिसून येते. चालकाची कॅबीन कधीही साफ केली जात नसल्याप्रमाणेच बरबटलेली दिसून येते. हा परिसर धुळीने माखलेल्या अवस्थेत दिसून येतो. याच ठिकाणी चालकांना आपले जेवणाचे डबे, पाण्याच्या बाटल्या, सोबत आणलेली ‘बॅग’ यासह अन्य वस्तू ठेवाव्या लागतात. परिणामी, चालकांनाही प्रचंड त्रास सहन करावा लागतो. शिवाय काही चालक बसमधूनच पिचकाऱ्या मारताना आढळून येतात. यामुळेही चालक कॅबीनमध्ये घाण साचत असून दुर्गंधी पसरते. याचा सामना चालक, वाहकासह संपूर्ण प्रवाशांना करावा लागतो. बहुतांश बसेसमध्ये दिसत असलेला हा प्रकार दूर करण्याकरिता अधिकारी, कर्मचारी कुठलीही उपाययोजना करताना दिसत नाहीत. आगारामध्ये बसेस साफ करण्यासाठी व्यवस्था केलेली आहे. प्रवासावरून आलेल्या बसेस पाण्याने धुवून स्वच्छ केल्या जातात; पण यातही दिरंगाईच केली जात असल्याने त्या धुतल्या की नाही, हा प्रश्नच पडतो. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत प्रवाशांना सुखकर प्रवासाची हमी देणे गरजेचे आहे.(कार्यालय प्रतिनिधी)प्रथमोपचार पेट्या झाल्या हद्दपारप्रवासामध्ये अपघात झाल्यास प्रवाशांवर प्रथमोपचार करता यावे म्हणून पूर्वी बसेसमध्ये प्रथमोपचार पेट्या ठेवण्यात येत होत्या. असे असले तरी बहुतांश बसेसमधील प्रथमोपचाराच्या पेटीमध्ये केवळ अगरबत्ती, माचिस यासह अन्य कचराच आढळून येत होता. उपचार करण्याचे साहित्य मात्र दिसतच नव्हते. यामुळे या पेट्या केवळ देखावाच ठरत होत्या. या पेट्यांचा उपयोगच होत नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर महामंडळाद्वारे त्या पेट्या काढण्यात आल्या. आता वाहकाजवळ प्रथमोपचाराचे साहित्य दिले जात असल्याचे सांगण्यात येते. असे असले तरी हे साहित्य वाहक खरोखर घेऊन फिरतात काय, हा प्रश्नच आहे. आजही काही बसेसमध्ये प्रथमोपचाराच्या पेट्या आढळून येतात; पण यात उपचाराचे साहित्य दिसत नाही. या पेट्यांमध्ये कचराच साचलेला असतो. काही बसेसमध्ये तर सर्रास खर्रा ठेवण्यासाठी या पेट्यांचा वापर होत असल्याचे पाहावयास मिळाले.दुरूस्तीकडेही कानाडोळाप्रवासावरून आल्यानंतर बसेसची तपासणी केली जाते. काही प्रसंगी परिवहन महामंडळाचे मेकॅनिक बसस्थानकावर येऊन बससेची तपासणी करतात तर बहुतांश बसेस गॅरेजमध्ये पाठविल्या जातात; पण अनेकदा बसेसच्या दुरूस्तीकडे कानाडोळाच केला जातो. यामुळे भंगार व खिळखिळ्या झालेल्या बसेस मधेच बंद पडतात. परिणामी, प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो.