घरफोडी करणारी ‘भुऱ्या-चच्चू’ची जोडी अखेर जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 15:36 IST2021-11-19T13:27:01+5:302021-11-19T15:36:17+5:30
घरफोडी करून दागिने तसेच लॅपटॉपसह इतर साहित्य चोरीप्रकरणी दोन चोरट्यांना अटक करून १२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करीत गुन्हा उघडकीस आणला.

घरफोडी करणारी ‘भुऱ्या-चच्चू’ची जोडी अखेर जेरबंद
वर्धा : घरफोडी करून दागिने तसेच लॅपटॉपसह इतर साहित्य चोरून नेल्याची तक्रार सेवाग्राम पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. पोलिसांनी याप्रकरणी दोन चोरट्यांना अटक करून १२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करीत गुन्हा उघडकीस आणला.
विनोद कोल्हे (रा. सेवाग्राम) हे बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरी चोरी करीत सोन्याची अंगठी, चांदीच्या तोरड्या, जोडवे, लॅपटॉप, मोबाईल असा एकूण २२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी सेवाग्राम पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर कोल्हे यांना सोन्याची अंगठी, चांदीच्या तोरड्या व जोडवे घरीच मिळून आले होते.
पोलिसांनी तपासचक्र फिरवून आरोपी शरद उर्फ भुऱ्या श्याम कातलाम, अशोक उर्फ चच्चू दीपक मडावी (दोन्ही रा. नागपूर) यांना अटक केली. त्यांच्याकडून लॅपटॉप, मोबाईल असा १२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे यांच्या निर्देशात हरिदास काकड, गजानन कठाणे, जयेश डांगे, आशिष लाडे, पवन झाडे, प्रगती झामरे यांनी केली.