शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

‘ब्राऊन रॉट’मुळे अकराशे हेक्टरवर फळगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील आठही तालुक्यांपैकी आष्टी (शहीद), कारंजा (घा.) व आर्वी तालुक्यात संत्रा, मोसंबीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. या तालुक्यांमध्ये ४ हजार ८०० हेक्टरवर संत्रा व मोसंबीचे लागवड क्षेत्र आहेत. यावर्षी बागा चांगल्या आल्या असतानाच सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे अचानक ब्राऊन रॉट (तपकिरी रॉट) या रोगाने आक्रमण केले.

ठळक मुद्देफळ उत्पादकांचे नुकसान : आष्टी तालुक्याला सर्वाधिक फटका, नुकसानग्रस्तांना मदतीची प्रतीक्षा

आनंद इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोनाच्या सावटाने अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आता सततचा पाऊस आणि विविध रोगांच्या प्रादुर्भावामुळे नुकसानीचा सामना करावा लागत आहे. सोयाबीन उत्पादकांची वाट लागली असतानाच आता संत्रा व मोसंबीवरही ‘ब्राऊन रॉट’ या रोगाने आक्रमण केल्याने जिल्ह्यातील १ हजार १८७.५० हेक्टरवरील फळगळ झाली आहे. त्यामुळे विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखल्या जाणाºया आर्वी, आष्टी (श.) व कारंजा (घा.) तालुक्यातील संत्रा उत्पादकांना पहिल्यांदाच जबर फटका बसला आहे.जिल्ह्यातील आठही तालुक्यांपैकी आष्टी (शहीद), कारंजा (घा.) व आर्वी तालुक्यात संत्रा, मोसंबीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतल्या जाते. या तालुक्यांमध्ये ४ हजार ८०० हेक्टरवर संत्रा व मोसंबीचे लागवड क्षेत्र आहेत. यावर्षी बागा चांगल्या आल्या असतानाच सततचा पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे अचानक ब्राऊन रॉट (तपकिरी रॉट) या रोगाने आक्रमण केले. त्यामुळे या तिन्ही तालुक्यातील १४४ गावांमधील १ हजार १८७.५० हेक्टरवरील बागा उद्धवस्त झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी अनेक वर्षांपासून जोपासलेल्या या बागांमधील फळे आता गळायला लागल्याने शेतकºयांच्या स्वप्नांचाही चुराडा झाला आहे. सोयाबीन पाठोपाठ आता संत्रा, मोसंबीही हातातून गेल्याने तात्काळ पंचनामे करुन उत्पादकांना नुकसानभरपाई देण्याची मागणी होत आहे. दिवसेंदिवस रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यावर लवकर नियंत्रण मिळविण्याची गरज व्यक्त होत आहे. ही परिस्थिती लवकर नियंत्रणात आली नाही तर सकाळी पडणारे धुके किंवा दवबिंंदूमुळे या फळपिकास गंभीर धोका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.फळ उत्पादकांनी अशा कराव्या उपाययोजनासर्वप्रथम खाली पडलेल्या पानांची व फळांची विल्हेवाट लावावी. ती शेतात तसीच राहू देऊ नये, अन्यथा या रोगाची तीव्रता वाढण्यास मदत होऊन संक्रमण जलद गतीने होते. वाफा स्वच्छ ठेवावा. बागेच्या उताराच्या बाजूने शेतातील पाणी बाहेर काढावे, कारण जिकडे पाणी साठून राहते त्या भागात फायटोफ्थोरा बुरशीची लागण अधिक होते.फायटोफ्थोरा फळावरील तपकिरी रॉटमुळे होणाºया फळगळसाठी संपूर्ण झाडावर फोसिटिल+ए.एल २.५ ग्रॅम किवा कॉपर आॅक्सिक्लोराईड ५० डब्ल.ूपी २.५ ग्रॅम किवा कॅप्टन ७५ डब्लू.पी २.५ ग्रॅम प्रति लिटर पाणी घेऊन फवारणी करावी किंवा २०० लिटर ड्रममध्ये जी.ए- २ ग्रॅम, कोरोफायरीफोस ५०० मिली, किटोशी ३००मिली, व्हॅलीडामायसिन ५००मिली व अमोनियम मॉलिब्डेनम २००ग्राम एकत्र करुन फवारणी करावी.संत्रा व मोसंबी पिकावर कायटोप्थोरा बुरशी व तपकिरी रॉटचे संक्रमण एवढ्या वर्षानंतर पहिल्यांदाच हवेतून पसरले आहे. संत्रा ४० टक्के तर मोसंबी गळ ९० टक्के झाली आहे. शासनाने हेक्टरी १ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी कृषी मंत्र्यांकडे केली आहे. संत्रा, मोसंबी यावर येणाºया रोगासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनाने संशोधन केंद्र देण्यात यावे. यासाठी पाठपुरावा शासनाकडे करणार आहे.- श्रीधर ठाकरे, अध्यक्ष, महाआॅरेंज महाराष्ट्र राज्य मुंबई.जिल्ह्यात ४ हजार ८०० हेक्टरवर संत्रा व मोसंबीची लागवड करण्यात आली असून ‘ब्राऊन रॉट’ मुळे जवळपास १ हजार १८७.५० हेक्टरवरील बागांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाकडून सर्वेक्षण सुरु असून शेतकºयांनाही उपायोजनासंदर्भात मार्गदर्शन केले जात आहे. नुकसानीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला जाणार असून शेतकºयांनी वेळीच काळजी घेण्याची गरज आहे.- अनिल इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.