शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

पिपरीच्या नवरदेवाचे वऱ्हाड पॉझिटिव्हच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2020 05:00 IST

पिपरी (मेघे) येथील एका नवविवाहित युवकाचा कोविड अहवाल ७ जुलैला पॉझिटिव्ह आला होता. तर आज त्याच्या निकट संपर्कात आलेल्या त्याच्या पत्नीसह नवरदेवाच्या आईचा अहवाल सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सध्या पिपरी (मेघे) येथील कोविड बाधितांची संध्या तीन झाली आहे. तर याच युवकाच्या लग्न सोहळ्यातील विविध कार्यक्रमात पुढे राहणाऱ्या नवरदेवाचा १८ वर्षीय मामे भाऊ आणि १३ वर्षीय मामे बहिणीलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल शुक्रवारी दुपारी आरोग्य विभागाला प्राप्त झाला.

ठळक मुद्देकोरोना ब्लास्ट : नवरी, नवरदेवाची आई, मामेभाऊ-बहिणीला संसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरानजीकच्या पिपरी (मेघे) येथील नवरदेवाचे चार वऱ्हाडी शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाच्या डोकेदुखीत भर पडली आहे. या नव्या कोरोना बाधितांमध्ये नवविवाहितेसह नवरदेवाची आई आणि इतवारा भागातील रहिवासी असलेला मामे भाऊ तसेच मामे बहिणीचा समावेश आहे. वर्धा शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या इतवारा भागात दोन रुग्ण आढळल्याने वर्धा शहरातही खळबळ उडाली आहे.पिपरी (मेघे) येथील एका नवविवाहित युवकाचा कोविड अहवाल ७ जुलैला पॉझिटिव्ह आला होता. तर आज त्याच्या निकट संपर्कात आलेल्या त्याच्या पत्नीसह नवरदेवाच्या आईचा अहवाल सकाळी कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे सध्या पिपरी (मेघे) येथील कोविड बाधितांची संध्या तीन झाली आहे. तर याच युवकाच्या लग्न सोहळ्यातील विविध कार्यक्रमात पुढे राहणाऱ्या नवरदेवाचा १८ वर्षीय मामे भाऊ आणि १३ वर्षीय मामे बहिणीलाही कोरोनाचा संसर्ग झाल्याचा अहवाल शुक्रवारी दुपारी आरोग्य विभागाला प्राप्त झाला.पिपरी (मेघे) येथील ७ जुलै रोजी कोरोनाबाधित निघालेल्या रुग्णाच्या निकट संपर्कातील त्यांची पत्नी (वय २३) आणि आई (वय ५१) यांची कोरोना चाचणी शुक्रवारी पॉझिटिव्ह आली आहे. पिपरी (मेघे) येथील ३३ वर्षीय पुरुष कोरोना बाधित निघाल्यावर त्यांच्या निकट संपर्कातील ३० व्यक्तीचे स्त्राव नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी काही व्यक्तींचे अहवाल शुक्रवारी प्राप्त झाले असून त्यातील चार व्यक्ती कोरोनाबधित असल्याचे निदान तपासणीअंती झाले आहे. या चारही कोरोना बाधितांना कोविड रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आहे. तर काहींचे अहवाल अस्पष्ट असल्याने त्यांची फेरतपासणी केली जाणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले यांनी सांगितले.इतवारातील दोघांना लग्नसोहळा भोवलापिपरी (मेघे) येथील युवकाच्या लग्नसोळ्याला जाण्यासह हळद आणि कंदुरीच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविणाºया इतवारा येथील दोघांना चांगलेच महागात पडले आहे. इतवारा येथील रहिवासी असलेले आणि नवरदेवाचा मामे भाऊ आणि मामे बहिण असलेल्या दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने वर्धा शहरातील इतवारा भागातील काही परिसर क्लस्टर कंटेन्मेंट कृती योजना अंमलात आणून सील करण्यात आला आहे. शिवाय या कोरोना बाधितांच्या निकट संपर्कात आलेल्यांचा शोध आरोग्य विभागाकडून घेतला जात आहे.आर्वीच्या जाजूवाडीने घेतला मोकळा श्वासआर्वी : जाजूवाडी भागात कोरोना रुग्ण आढळल्याने या परिसरात संचारबंदी लागू करून कंटेन्मेंट तसेच बफर झोन तयार करण्यात आला होता. शुक्रवारी या परिसरातील कंटेन्मेंट झोन उपविभागीय न्याय दंडाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी हरिष धार्मिक यांच्या आदेशान्वये उठविण्यात आला आहे.पुलगाव शहरातील चित्रा टॉकीज भागातील कंटेन्मेंट झोन १४ दिवसांनंतर उठलादेवळी तालुक्यातील पुलगाव येथील चित्रा टॉकिज भागात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर तेथे क्लस्टर कंटेन्मेंट कृती आराखडा अंमलात आणून संपूर्ण परिसर कंटेन्मेंट झोन जाहीर करून सील करण्यात आला होता. मागील १४ दिवसांच्या काळात या कंटेन्मेंट झोन परिसरात कुठलाही नवीन कोरोना रुग्ण न आढळल्याने तेथील कंटेन्मेंट झोन शुक्रवारी उठविण्यात आला आहे. तसा आदेश उपविभागीय न्याय दंडाधिकारी तथा उपविभागीय महसूल अधिकारी सुरेश बगळे यांनी निर्गमित केला आहे.उपचारासाठी दाखल झाली अन् कोरोनाबाधित निघालीसेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेली ६५ वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. ही महिला यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील रहिवासी असून तिच्या कोविड चाचणीचा अहवाल शुक्रवारी आरोग्य विभागाला प्राप्त झाला. या कोरोना रुग्णाची माहिती यवतमाळ जिल्हा प्रशासनाला देण्यात आली आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या