शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरसह दोघे गंभीर

By admin | Updated: November 20, 2014 22:56 IST

वर्धा मार्गावरील औद्योगिक वसाहतीच्या टी-पॉर्इंटवर सहा चाकी टिप्परने कारला जबर धडक दिली. या धडकेत कारमधील दोनजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ सावंगी रुगालयात नेण्यात आले.

एमआयडीसी वसाहतीनजीक टिप्परची कारला जबर धडक देवळी : वर्धा मार्गावरील औद्योगिक वसाहतीच्या टी-पॉर्इंटवर सहा चाकी टिप्परने कारला जबर धडक दिली. या धडकेत कारमधील दोनजण गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ सावंगी रुगालयात नेण्यात आले. हा अपघात गुरुवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडला. पोलीस सुत्रानुसार, नागपूर कमाल चौक येथील नेत्रतज्ज्ञ डॉ. गोपाल सुरेंद्र अरोरा (६०) हे स्वत:च्या कार क्रमांक एमएच ३१ ईए ६२५१ ने यवतमाळकडे जात होते. साप्ताहिक क्लिनिक असल्यामुळे त्यांना सकाळी ७.३० वाजेपर्यंत यतवमाळ येथे पोहचायचे होते. दरम्यान देवळी औद्योगिक वसाहतीकडून वर्धा मार्गावर भरधाव येत असलेल्या सहा चाकी टिप्पर एमएच ३२ क्यू १२३१ ने त्यांच्या कारला जबर धडक दिली. यात कार चालक धुलचंद तिवारी रा. नागपूर यांच्या पोटाला व छातीला जबर दुखापत झाली. डॉ. अरोरा सुद्धा जखमी झाले. या दोघांनाही सावंगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. धडक एवढी जबर होती की यात कार टिप्परच्या मधोमध जावून फसली. यामुळे कारमधील जखमींना बराच वेळ काढणे शक्य झाले नाही. पोलीस व रुग्णवाहिका आल्यानंतर जखमींना बाहरे काढण्यात आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा टिप्पर वर्धा येथील विशाल मानकर यांचा असून चालक जगदेव बिसन इंगळे (४५) रा. येळाकेळी याला अटक करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)