शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बळीराजा उन्हाळवाहीत व्यस्त

By admin | Updated: April 30, 2016 02:24 IST

खरीप व रबी असे दोन हंगाम बळीराजाकरिता महत्त्वाचे असतात. नुकताच रबी हंगाम संपल्याने येणाऱ्या खरीप हंगामाची पूर्वतयारीला प्रारंभ झाला आहे.

खरीप हंगामाची तयारी : मशागतीचे काम ट्रॅक्टरच्या सहाय्यानेघोराड : खरीप व रबी असे दोन हंगाम बळीराजाकरिता महत्त्वाचे असतात. नुकताच रबी हंगाम संपल्याने येणाऱ्या खरीप हंगामाची पूर्वतयारीला प्रारंभ झाला आहे. उन्हाळवाहीच्या कामात बळीराजा व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. शेतमालाला योग्य भाव मिळाण्याची कायम प्रतीक्षा करीत असलेल्या बळीराजाला सूर्योदय व सूर्यास्त शेताच्या बांधावरच पाहावा लागतो. रखरखत्या उन्हात शेतातील कामे उरकण्यासाठी जीवाचा आटापीटा करावा लागत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात खरीप हंगामाची पेरणी झाल्यानंतर उगवणारे पीक जनावरे येवू नये म्हणून धुऱ्यावर कुंपण करण्यासाठी बोरीच्या झाडाच्या काट्या तोडून फास लावणे, शेतीची नांगरणी करणे, शेतातील केरकचरा वेचणे, बांधावरील तण नाहीशे करणे, शेत खत टाकणे आदी कामे अवघ्या दोन महिन्यात आटोपणे गरजेचे असते. त्यातच लग्नसराई असल्याने यात विलंब होतो. उष्णतामान वाढत असले तरी शेतात राबावेच लागत असल्याने शेतकरी त्याची बैलजोडी घेऊन शेताकडे जाताना दिसतो. अवघ्या एक महिन्यावर रोहिणी नक्षत्र आले आहे. उन्ह, वारा, पाऊस यात बळीराजाला काम करावेच लागते. नापिकी आली तरी, अतिवृष्टीने पीक गेले तरी आणि कर्जबाजारी झालो तरी शेती करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. येणारा दिवस हा आमच्यासाठी चांगला दिवस येईल, अशी आशा ठेवून शेतकरी खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येते. शेताची मशागत करण्यासाठी परिसरात वखरणीचे काम सुरू झाले आहे. यानंतर बळीराजाची आस वरुणराजाच्या आगमनाकडे असणार आहे.(वार्ताहर)रोहिणी नक्षत्र महिनाभरावरबैलजोडीच्या वाढलेल्या किंमती पाहता बहुतांश शेतकऱ्यांजवळ बैलजोडी नाही. त्यामुळे उन्हाळवाहीचे कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जात आहे.नांगरणी, वखरणी, धुरळणी ही कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. रोहिणी नक्षत्र महिनाभरावर असल्याने मशागतीचे कामे आटोपणे गरजेचे आहे. याकरिता शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.पारंपरिक साधनांसह आता शेतीकरिता यंत्रसामग्रीचा वापर केला जातो. यामुळे श्रमाची बचत होत असली तरीही लागवडीच्या खर्चात मात्र वाढ होत असल्याचे बोलले जाते.शेणखतासाठी करावी लागते भटकंतीशेतातील पीक सकस व भरघोस येण्यासाठी तसेच अधिकाधिक उत्पन्न होण्यासाठी शेतकरी खत देतो. यातून दोन पैसे पदरात पडावे व शेताची पोत कायम राखण्यासाठी शेणखताची आवश्यकता असते. पण जनावरांची संख्या कमी होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना जिल्ह्याबाहेर जाऊन शेणखत आणावे लागत आहे. शेतकरी शेणखतासाठी भटकंती करीत असून यात खर्चही अधिक होत आहे.