शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

रबीतही राष्ट्रीय कृषी विमा योजनेचा लाभ

By admin | Updated: November 9, 2014 23:17 IST

रबी हंगामासाठी वर्धा जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील १०७ महसूल मंडळे याकरिता अधिसूचित करण्यात आलेली आहेत. महसूल मंडळांची यादी तालुका कृषी अधिकारी

वर्धा : रबी हंगामासाठी वर्धा जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय कृषी विमा योजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील १०७ महसूल मंडळे याकरिता अधिसूचित करण्यात आलेली आहेत. महसूल मंडळांची यादी तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी. बऱ्हाटे यांनी कळविले आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत पिकाची पेरणी झाल्यापासून एक महिना किंवा जास्तीत जास्त ३१ डिसेंबरपैकी जे आधी असेल ती राहील. या योजनेंतर्गत पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी नुकसान भरपाई वैयक्तिकस्तरावर निश्चित करण्याची पद्धत जिल्ह्यातील सर्व अधिसूचित पिकांसाठी रब्बी २०१३-१४ हंगामात सर्व विमा अधिसूचित क्षेत्रात वाढविण्यात आलेली आहे.पूर, चक्रीवादळ, भूस्खलन व गारपीट या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान हे कृषी विमा कंपनीकडून वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येणार आहेत. यासाठी स्थानिक आपत्तीमुळे योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचे वैयक्तिकरित्या नुकसान झाल्यास सदर शेतकऱ्यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत भाग घेतलेला आहे. त्या संबंधीत वित्तीय संस्थेस किंवा भारतीय कृषी विमा कंपनीस नुकसान झाल्यापासून ४८ तासात नुकसानग्रस्त अधिसूचित पिकांची माहिती, नुकसानीचे कारण व प्रमाण कळविणे आवश्यक आहे. भारतीय कृषी विमा कंपनीने जिल्हा महसूल कार्यालयाच्या मदतीने नुकसान भरपाई करण्यात येणार आहे. योजनेच्या मार्गदर्शक सूचना व प्रपत्र सर्व बँकामध्ये उपलब्ध आहेत. राष्ट्रीय कृषी विमा योजना फायद्याची असल्याचे लाभ घ्यावा, असे बऱ्हाटे यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)