शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

बी.ई. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत घोळ

By admin | Updated: September 22, 2014 23:25 IST

अभियांत्रिकीतील काही विद्यार्थ्यांना सत्र २०१२-१३ मधील शिष्यवृत्ती अद्यापही मिळालेली नाही. शिष्यवृत्तीपासून वंचित विद्यार्थ्यांनी समाजकल्याण कार्यालयात तक्रार दिली. वारंवार चकरा मारल्या

वर्धा : अभियांत्रिकीतील काही विद्यार्थ्यांना सत्र २०१२-१३ मधील शिष्यवृत्ती अद्यापही मिळालेली नाही. शिष्यवृत्तीपासून वंचित विद्यार्थ्यांनी समाजकल्याण कार्यालयात तक्रार दिली. वारंवार चकरा मारल्या पण विभागाकडून विद्यार्थ्यांची बोळवण करण्यात आली. काही विद्यार्थ्यांना एका सत्रात दोनदा शिष्यवृत्ती मिळाली तर काहींना अद्याप शिष्यवृत्तीची प्रतीक्षा आहे. याची चौकशी करून वंचित विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याची मागणी ए.आय.एस.बी. यांनी निवेदनातून केली आहे. या निवेदनानुसार, समाजकल्याण कार्यालयातील शिष्यवृत्ती विभागाकडून तक्रारीची दखल घेतली जात नाही. वरिष्ठ अधिकारी याबाबत अनभिज्ञ असतात. यामुळे समस्या कायम असून तक्रार करुन विद्यार्थी त्रस्त झाले आहे. तक्रार करण्यास गेले असता कार्यालयातील कर्मचारी टोलवाटोलवी करतात. तुम्ही कॉलेज मध्ये विचारा असे सांगितले जाते. विद्यार्थी याची विचारणा कॉलेजमध्ये करतात तर त्यांना समाजकल्याण येथे जाण्यास सांगितले जाते. सततच्या हेलपाटामुळे विद्यार्थी निराश झाले आहेत. त्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही. तर काही विद्यार्थ्यांना एका सत्रात दोनदा शिष्यवृत्ती मिळाली. या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी आॅल इंडिया स्टुडंट ब्लॉक पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने समाजकल्याण सहआयुक्त देशमुख तसेच निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाढे यांच्याकडे निवेदनातून केली. यावेळी शिष्टमंडळाने त्यांच्याशी चर्चा केली. काही विद्यार्थ्यांना दोन, तिनदा शिष्यवृत्ती मिळाल्यामुळे अन्य विद्यार्थी वंचित राहिले. त्यामुळे ज्यांना एका सत्रात दोनदा शिष्यवृत्ती मिळाली त्यांच्या खात्यातील रक्कम वळती करणे शक्य नाही. मात्र वंचित विद्यार्थ्यांकरिता वेगळ्या निधीची तरतूद करण्याची मागणी या चर्चेत करण्यात आली. यासह एकाच विद्यार्थ्यांच्या खात्यात अनेकदा पैसे जमा होतातच कसे, असे होत असेल तर ही चुकी कुणाची, यात काही साटेलोटे आहे काय चौकशी केली जावी. याची चौकशी करण्यात दिरंगाई केल्यास समाजकल्याण आयुक्तांनी याचे उत्तर द्यावे, असा इशारा निवेदनातून देण्यात आला.आॅल इंडिया स्टुंडटस ब्लॉक संबंधित प्रशासनाकडे निवेदनाची प्रत दिली आहे. आठ दिवसात जर या वंचीत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नाही तर आॅल इंडिया स्टुंडटस ब्लॉक यांचाकडून मागणीकरिता आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. चर्चा करताना शिष्टमंडळात तुषार उमाळे यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)