शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! वर्धा कोरोना पॉझिटिव्हीटीत राज्यात दुसऱ्या स्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 05:00 IST

कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी मंगळवारी राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांसह बड्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. याच बैठकीदरम्यान वर्धा जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर राज्यात द्वितीय स्थान पटकाविणारा असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात कोरोना बाबत खबरदारीच्या उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

ठळक मुद्देआता पोलीस विभाग लावणार बेशिस्तांना शिस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कोरोना संकटाच्या काळात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान तब्बल ५० दिवस कोरोनाला रोखणाऱ्या वर्धा जिल्ह्यावर सध्या मोठे संकट ओढावले आहे. कोरोना पॉझिटिव्हीटीत वर्धा राज्यात द्वितीय स्थानी पोहोचला असून ही बाब प्रत्येक वर्धेकराच्या अडचणीत भर टाकणारी आहे. भविष्यातील संकट लक्षात घेवून आता जिल्हा प्रशासनाने नवीन रणनिती आखली असून वर्धा जिल्ह्यात पुन्हा नव्या जोमाने खबरदारीच्या उपाय योजनांची अंमलबजावणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे यात पोलीस विभागाचे सहकार्य घेतले जाणार असून आता पोलीस विभाग बेशिस्तांना शिस्त लावणार आहे.कोरोना रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेवून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यांनी मंगळवारी राज्यातील सर्वच जिल्हाधिकाऱ्यांसह बड्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. याच बैठकीदरम्यान वर्धा जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर राज्यात द्वितीय स्थान पटकाविणारा असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे वर्धा जिल्ह्यात कोरोना बाबत खबरदारीच्या उपाय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचना केंद्रस्थानी ठेवून गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांसह घराबाहेर पडल्यावर मास्कचा वापर न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांना अनुसरून पोलीस विभागानेही नव्या जाेमाने बेशिस्तांना शिस्त लावण्यासाठी कंबर कसली आहे. विशेष म्हणजे पुढील १५ दिवस वर्धा जिल्ह्यातील नागरिकांकडून काेरोना संदर्भातील खबरदारीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी पोलीस विभाग करून घेणार आहे. त्यामुळे बेशिस्तांनी आता वेळीच सावध होण्याची गरज आहे. 

पॉझिटिव्हीटी दरात वर्धा राज्यात द्वितीय स्थानी असून नागरिकांनी घाबरून नये. पण प्रत्येक नागरिकाने अधिक लक्ष राहून खबरदारीच्या उपाय योजनांची तसेच जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.- प्रेरणा देशभ्रतार, जिल्हाधिकारी, वर्धा. 

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेवून पुढील १५ दिवस शासनाच्या आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून पोलीस विभाग सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणाऱ्यांसह मास्कचा वापर न करणारे तसेच विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहे. तशा सूचना आपण सर्व पोलीस स्टेशन मधील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.- प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक, वर्धा.

कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तीने तातडीने नजीकच्या शासकीय रुग्णालयात जावून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घेत कोविड चाचणी करून घ्यावी. कोरोनाकाळात वर्धेकरांचे यापूर्वी चांगले सहकार्य मिळाले असून आताही सहकार्याची अपेक्षा आहे.- डॉ. सचिन ओंम्बासे, मुख्य कार्यपालन अधिकारी, जि. प. वर्धा.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारी