शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिकदृष्ट्या हतबल शेतकऱ्याला हवा शासनाचा आधार

By admin | Updated: August 17, 2014 23:20 IST

निसर्गावर अवलंबून असणाऱ्या बळीराजा पुढे खरीप हंगाम धोक्याची घंटा देत आहे. यामुळे रबीचा हंगामही लांबणार असल्याचे चित्र निर्माण होत आहे. यामुळे यंदाचा हंगाम गतवर्षीच्या

घोराड : निसर्गावर अवलंबून असणाऱ्या बळीराजा पुढे खरीप हंगाम धोक्याची घंटा देत आहे. यामुळे रबीचा हंगामही लांबणार असल्याचे चित्र निर्माण होत आहे. यामुळे यंदाचा हंगाम गतवर्षीच्या हंगामाप्रमाणेच धोक्याचा तर ठरणार नाही ना अशी भीती शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे.या महिन्यात खरीपातील कपाशी पात्या फुलावर राहायला हवी होती; पण पावसाच्या लहरीपणामुळे पिकाची वाढ खुंटली तर सोयाबीनला शेंगा लावण्याचा हा हंगाम होता. नुकत्याच गत १० ते १५ दिवसांपूर्वी पेरण्या झाल्या. अशात पावसाची दडी बसल्याने त्या धोक्यात आल्या. सोयाबीन हे पीक पेरणीपासून पाऊस योग्य राहिल्यास ११० दिवसानंतर मळणी योग्य होते. यात जुलैच्या अखेरीस व आॅगस्टच्या पहिल्या सप्ताहात पेरण्या झाल्याने या पिकाची मळणी व सवंगणी नोव्हेंबरच्या अखेरीस व डिसेंबर मध्ये होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत; मात्र असाच पाऊस राहिल्यास लावलेला खर्चही निघेल अथवा नाही ही अपेक्षाही व्यर्थ आहे. त्यामुळे सोयाबीनच्या मळणी नंतर याच क्षेत्रात रबीत गहू व चणा हे पीक शेतकरी घेतात. त्यामुळे या पिकाच्या पेरण्या लांबल्यास डिसेंबरच्या शेवट व जानेवारीत पेरण्या झाल्यास गहू पिकाला लागणारा गारवा राहणार नाही. त्यामुळे रबीचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता शेतकरी वर्तवीत आहेत. या बरोबरच रबीही धोक्यात सापडणार या चिंतेने बळीराजाला ग्रासले आहे.खरीप हंगामातील दुबार तिबार पेरणीच्या खर्चाने जवळ होता नव्हता पैसा निघून गेला. शेतातील पिकाकडे पाहताच हंगाम हातातून गेल्याचे दिसत आहेत. यामुळे अनेक अडचणीचा सामना बळीराजाच्या कुटुंबाला करावा लागतो. अशात इतर खर्च व येत्या दिवसात वैरणाची समस्या समोर येणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यातून मार्ग काढण्याची चिंता शेतकऱ्यांसमोर आहे. (वार्ताहर)