शहरं
Join us  
Trending Stories
1
Prateek Yadav: मुलायम सिंह यादव यांचे पुत्र प्रतीक यादव यांचं वयाच्या ३८ व्या वर्षी निधन
2
Aadhaar Card बनवणाऱ्यांसाठी मोठी बातमी! UIDAI नं बदलले नियम, आता 'या' नव्या डॉक्युमेंट्ससह होणार काम, पाहा
3
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा 'बुलडोजर'
4
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सरकारने आयात शुल्कात केली भरमसाठ वाढ; आजपासूनच दर वाढणार
5
विशेष लेख: नरेंद्र मोदी-अमित शाह यांचे पुढचे लक्ष्य?- अर्थातच पंजाब!
6
NEET Paper Leak: कॉमा-फुलस्टॉपसह प्रश्न जसेच्या तसे; नीट-२०२६च्या ‘गेस पेपर’ने खळबळ; एका पेपर लीकमधून १०० कोटींची उलाढाल
7
आजचे राशीभविष्य - १३ मे २०२६,आर्थिक लाभ होऊ शकतात, नवीन कामाची सुरूवात आज करा
8
अग्रलेख: ‘नीट’ फेरपरीक्षेचा वरवंटा! लाखो विद्यार्थ्यांची स्वप्ने चिरडली जाणार
9
IPL 2026 Points Table: क्वॉलिफायर १ चे दोन प्रबळ दावेदार; उर्वरित २ जागांसाठी ६ संघांमध्ये चढाओढ
10
नवे ‘डिजिटल वॉर’, मेसेजिंग अ‍ॅपचा होतोय वापर; 'लष्कर-ए-तैयबा'च्या दहशतवाद्याच्या चौकशीतून समोर आली धक्कादायक माहिती
11
‘काटकसर’ने १७ लाख कोटी बुडाले; सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, रुपया जोरदार आपटला
12
विशेष लेख: स्वतंत्र, सतर्क, सक्रिय वकील हा लोकशाहीचा कणा!
13
NEET Paper Leak: पेपरफुटीचे लातूर, नाशिक, पुणे कनेक्शन; सराव परीक्षेच्या पेपरमधील अनेक प्रश्न जशास तसे
14
पेट्रोल-एलपीजीच्या दरवाढीने घरगुती अर्थकारण कोलमडणार; खाद्यतेल, सोने, इंधनाचा वापर कमी करण्यावर भर
15
NEET UG 2026 Cancelled: नीट रद्द! लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा द्यावी लागेल परीक्षा; पेपरफुटीची सीबीआय चौकशी होणार
16
काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
17
मुंबईतील सर्वोदय को-ऑपरेटिव्ह बँकेचा परवाना आरबीआयकडून रद्द, ठेवीदारांच्या पैशाचे काय होणार?
18
विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
19
Sangli: वादळात मंदिराची भिंत कोसळली, दगडांखाली दबून ६ भाविक ठार, आठ जखमी
20
"मी काही रबर स्टँप नाही"; CBI प्रमुखांच्या निवड प्रक्रियेवर राहुल गांधींचा बहिष्कार, पंतप्रधानांना दिले पत्र
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिजासह चोरट्यांचे रेतीवर लक्ष

By admin | Updated: December 11, 2014 23:11 IST

आष्टी तालुक्यातील काही शिवारात गत काही महिन्यापासून मुरूमाचे मोठ्या प्रमाणात जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केले जात आहे़ या गंभीर प्रकाराकडे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे़

तळेगाव (श्या़पं़) : आष्टी तालुक्यातील काही शिवारात गत काही महिन्यापासून मुरूमाचे मोठ्या प्रमाणात जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केले जात आहे़ या गंभीर प्रकाराकडे महसूल विभागातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे़ या गौण खनिजच्या चोरीला महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचा अप्रत्यक्ष आशीर्वाद असल्याचा आरोप नागरिकांद्वारे केला जात आहे़
आष्टी तालुक्यातील तळेगाव, भारसवाडा, अंतोरा, धाडी, बांबर्डा, थार गावांच्या शिवारात अवैधरित्या मुरूमाचे खोदकाम करून मुरूम चोरीला जात असल्याची माहिती ग्रामस्थ देत आहे. काही शिवारात असलेल्या टेकड्यावर जेसीबीच्या मदतीने खोदकाम केले जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीदरम्यान निदर्शनास आले़ या ठिकाणी रात्री ९ वाजतानंतर मुरूमाच्या खोदकामाला सुरुवात केली जात आहे. हे उत्खनन पहाटे ५ वाजेपर्यंत अव्याहतपणे सुरू राहत असल्याची माहिती परिसरातील नागरिक देत आहेत.
खोदकाम करण्यात आलेला मुरूम येथून रात्रभरात ट्रक, ट्रॅक्टरने बाहेर ठिकाणी नेला जातो़ हा संपूर्ण प्रकार काही स्थानिक तरुणांनी महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देत खोदकाम करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली़ मात्र, संबंधित अधिकाऱ्यांनी या मागणीकडे लक्ष दिले नसल्याचा आरोप होत आहे. महसूल विभागातील या गौण खनिजाच्या खोदकामाकडे लक्ष देत नसून कुठलीही कारवाई करीत नाही़
आष्टी तालुक्यात तळेगाव, भारसवाडा, अंतोरा, धाडी, बांबर्डा, थार आदी गावशिवारात टेकड्यांची बहूलता आहे. तसेच या टेकड्यांवरील मुरूमही अतिशय चांगल्या दर्जाचा असल्याने परिसरात त्याची मोठी मागणी आहे. हीच बाब हेरून परिसरात गौनखनिज चोरटे सक्रीय झाले असून रात्रीच्या वेळी चक्क जेसीबीच्या सहाय्याने अविधरित्या मुरुमाचे अखंद उत्खनन केले जात आहे.
या कारणाने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. तरीही शासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने गौण खनिजच्या चोरीला महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांचा अप्रत्यक्ष आशीर्वाद तर नसावा असा संशय नागरिक व्यक्त करीत आहे. जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम होत असूनही कारवाई नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.(वार्ताहर)