शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

वाळूमाफियांकडून वनरक्षकास जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 05:00 IST

वर्धा जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव झाला नसला तरी वाळू माफियांकडून अवैध उत्खनन करून वाळूची चोरी केली जात आहे. अवैधपणे उत्खनन केलेली वाळूची वनजमिनीतून तयार केलेल्या रस्त्याने वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर वनविभागाच्या दोन चमू हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही शिवाराकडे रवाना झाल्या. या चमूतील काही वनकर्मचारी दुचाकीने होते.

ठळक मुद्देदुचाकीला धडक देत पाडले जमिनीवर : आरोपीमध्ये जांगोणाच्या सरपंचाचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वन जमिनीतून वाळूची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या वनरक्षक मुनेश सज्जन यांच्यावर अतिज्वलनशील पदार्थ टाकून त्यांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न वाळूमाफियांनी केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ही घटना मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही-सास्ताबाद पांदण रस्ता मार्गावर घडली. सदर प्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीमध्ये जांगोणा येथील सरपंच नीतीन वाघ यांचा समावेश आहे.वर्धा जिल्ह्यातील वाळू घाटांचा लिलाव झाला नसला तरी वाळू माफियांकडून अवैध उत्खनन करून वाळूची चोरी केली जात आहे. अवैधपणे उत्खनन केलेली वाळूची वनजमिनीतून तयार केलेल्या रस्त्याने वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावर वनविभागाच्या दोन चमू हिंगणघाट तालुक्यातील कोल्ही शिवाराकडे रवाना झाल्या. या चमूतील काही वनकर्मचारी दुचाकीने होते. दुचाकीने वाळू माफियांचा शोध घेणाऱ्यांमध्ये वनरक्षक मुनेश्वर सज्जन व सदाशीव माने यांचा समावेश होता. खाकीवर्दीतील वनरक्षक कारवाईसाठी आल्याचे लक्षात येताच आरोपींनी त्यांच्या ताब्यातील चारचाकी वाहनाने सज्जन यांच्या एम. एच. ३२ ए.एल. ५०५२ क्रमांकाच्या दुचाकीला धडक देत त्यांना जमिनीवर पाडले. आरोपी इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी सोबत असलेला अतिज्वलनशील पदार्थ सज्जन यांच्या अंगावर टाकून त्यांना जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला. सज्जन यांनी आरडा-ओरड केल्यावर आरोपींनी पळ काढला. या प्रकरणी वनरक्षक मुनेश सज्जन यांनी वडनेर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी वाळू माफिया उबालू कुबडे रा. पोहणा, जांगोनाचे सरपंच तथा वाळू माफिया नीतीन वाघ रा. जांगोणा यांच्यासह त्यांच्या दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांच्या भूमिकेकडे लक्षऐरवी या ना त्या कारणाने नागरिकांसाठी चर्चेचा विषय ठरणाऱ्या वडनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडल्याने वाळू माफियांना पोलिसांचा आर्शीवाद तर नाही ना अशी चर्चा वनविभागातील अधिकाºयांसह कर्मचाऱ्यांमध्ये होत आहे. सदर घटनेनंतर वडनेर येथील ठाणेदार वाळू माफियांच्या मनमर्जीला ब्रेक लावण्यासाठी काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :sandवाळूforest departmentवनविभाग