व्हिडीओ : अशोक गहलोत व अशोक चव्हाण यांची बापू कुटीला भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 17:24 IST2018-09-24T17:15:26+5:302018-09-24T17:24:48+5:30

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी 2 ऑक्टोबर रोजी सेवाग्राम येथे येणार आहेत.

Ashok Gehlot and Ashok Chavan visit to Bapu Kuti At Sewagram Ashram, Wardha | व्हिडीओ : अशोक गहलोत व अशोक चव्हाण यांची बापू कुटीला भेट

व्हिडीओ : अशोक गहलोत व अशोक चव्हाण यांची बापू कुटीला भेट

वर्धा - काँग्रेस अध्यक्षराहुल गांधी 2 ऑक्टोबर रोजी सेवाग्राम येथे येणार आहेत. सेवाग्राम येथील गांधी शांती भवनात अखिल भारतीय काँग्रेस कमेटीच्या कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचे पूर्वनियोजन करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव अशोक गहलोत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सोमवारी दुपारी सेवाग्राम आश्रमला भेट दिली. तसेच तेथील परिसराची पाहणी केली.

आश्रमाचे अध्यक्ष  टी.आर.एन. प्रभू यावेळी उपस्थित होते. राहुल गांधी बापूजींच्या प्रार्थनास्थळाला भेट दिल्यानंतर सेवाग्राम येथेच बैठक घेणार आहे. अशोक चव्हाण व गहलोत यांनी सेवाग्राम भेटीनंतर वर्धा जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. यावेळी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चारूलता टोकस, आमदार रणजित कांबळे आदी उपस्थित होते.

Web Title: Ashok Gehlot and Ashok Chavan visit to Bapu Kuti At Sewagram Ashram, Wardha