शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
2
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
3
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
4
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
5
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
6
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
7
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
8
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
9
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
10
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
11
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
12
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
13
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
14
"आता फक्त राफेल सोडायचं शिल्लक ठेवलंय..."; बंगाल निवडणुकीत अभिषेक बॅनर्जींचा खळबळजनक आरोप
15
तब्बल ४० तास हृदयाची धडधड होती बंद, तरीही जिवंत राहिली ही व्यक्ती, चमत्कार की...
16
वहिनी अश्विनी देशमुख यांच्या पराभवानंतर धनंजय देशमुख स्पष्टच बोलले; म्हणाले, “संतोष अण्णा...”
17
Gold Silver Rate 29 April: सोन्या-चांदीच्या दरात बदल; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
18
नृसिंह जयंती २०२६: गुरुवारी आलाय खास योग; बाधा मुक्तीसाठी करा 'हळदीचा' हा प्रभावी उपाय!
19
हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला...
20
भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत...  
Daily Top 2Weekly Top 5

आर्वी तालुक्यात ३ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2020 06:00 IST

मंगळवारी रात्रीपर्यंत पावसाचा काही अंदाज नसतानाही रात्री साडेनऊ वाजतादरम्यान अचानक मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. जवळपास दीड तास चालेल्या या वादळीपावसाने तालुक्यातील गहू, चणा व भाजीपाला वर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कदेउरवाडा/आर्वी : आर्वी तालुक्यामध्ये मंगळवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे तब्बल ३ हजार ३८३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून १४ घरांची पडझड झाल्याची प्राथमिक माहिती महसूल विभागाकडून देण्यात आली आहे.मंगळवारी रात्रीपर्यंत पावसाचा काही अंदाज नसतानाही रात्री साडेनऊ वाजतादरम्यान अचानक मेघगर्जनेसह वादळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धावपळ उडाली. जवळपास दीड तास चालेल्या या वादळीपावसाने तालुक्यातील गहू, चणा व भाजीपाला वर्गीय पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पावसादरम्यान देउरवाडा व आर्वीतील उलापूर नाका परिसरात बोराच्या आकाराची गार पडल्याने घरावरील कवेलू फुटले. मजुरांअभावी बऱ्याच शेतकऱ्यांचा गहू व चणा उभा असून काहींनी सवंगणी करुन शेतातच ढिग मारुन ठेवला आहे. या पावसाने गहू व चणा भिजल्याने शेतकºयांना आर्थिक फटका बसला आहे. पावसाला सुरुवात होताच विद्युत पुरवठाही खंडीत झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची गैरसोय झाली. शेवटी रुग्णांच्या नातेवाईकांना मोबाईलची बॅटरी सुरु करुन त्या प्रकाशात रुग्णांची काळजी घेतली. रुग्णालयातील जनरेटरही या काळात सुरु केले नव्हते तसेच कर्मचाºयांनीही रुग्णांकडे दुर्लक्ष केल्याचे रुग्णांचे नातेवाईक राजेश शिरघरे यांनी सांगितले. वादळामुळे ग्रामीण भागातील घरांचे छत उडाल्याने नुकसान झाले. वाढोना येथील शंकर देहाडे यांच्या घराचे छत उडाल्याने त्यांचा परिवार उघड्यावर आला आहे. विरुळ परिसरातही मोठा फटका बसला असून बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठे झाड कोसळल्याने वाहतूक खोळंबली होती. या परिसरातील संमृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या कॅम्पचे शेड उडाल्याने कपडे, अन्नधान्य व इतर साहित्य भिजले आहे. बुधवारी सकाळीही पावसाने हजेरी लावली.या वादळी पावसाने गहू आणि चणा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच घरेही बाधित झाल्याची माहिती असून प्रत्येक मंडळातून माहिती घेणे सुरु आहे. सायंकाळपर्यंत पूर्ण माहिती कार्यालयाला प्राप्त होईल.- विद्यासागर चव्हाण, तहसीलदार आर्वी.

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी