शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

कोटींच्या थकबाकीने महावितरणची बत्ती गूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 6:00 AM

पाणी योजनांची थकीत वीज देयकाची परिस्थिती म्हणजे शेतकऱ्यांसाठी वारंवार होणाऱ्या कर्जमाफी सारखी झाली आहे. कर्जमाफी होणार म्हणून काही शेतकरी कर्जच भरत नाहीत. असेच काहीतरी सुट अथवा संपूर्ण थकीत रक्कम माफ होईल, या आशेने अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या पाणीपुरवठाच्या वीज देयकाच्या बाबतीतही होत असल्याचे चित्र आहे.

ठळक मुद्देपाणीपुरवठा योजनेचे देयक रखडले : १ हजार ११९ ग्राहकांनीही फिरविली पाठ

चैतन्य जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वर्धा विभागासह आर्वी आणि हिंगणघाट या तीन उपविभागातील ग्रामपंचायतीच्या १ हजार ११९ ग्राहकांकडे पाणीपुरवठा योजनेच्या देयकापोटी तब्बल ३ कोटी २५ लाख ५० हजार ९१३ रूपयांची थकबाकी असल्याने महावितरणचीच बत्तीगूल झाली आहे. या देयकांच्या वसुलीकरिता महावितरण कंपनी सरसावली असून ‘थकबाकी भरा अन्यथा वीज पुरवठा खंडीत करा’ असे धोरण स्वीकारले आहे. याबद्दल ग्रामपंचायतींनाही सूचना दिल्या असून प्रतिसाद मिळाला नाही तर प्रत्यक्ष कारवाई संकेतही अधिकाऱ्यांनी दिले आहे.पाणी योजनांची थकीत वीज देयकाची परिस्थिती म्हणजे शेतकऱ्यांसाठी वारंवार होणाऱ्या कर्जमाफी सारखी झाली आहे. कर्जमाफी होणार म्हणून काही शेतकरी कर्जच भरत नाहीत. असेच काहीतरी सुट अथवा संपूर्ण थकीत रक्कम माफ होईल, या आशेने अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या पाणीपुरवठाच्या वीज देयकाच्या बाबतीतही होत असल्याचे चित्र आहे. पाणी योजनांची वीज देयक थकीत पडद्यामागचे मूळ संबंधित ग्रामपंचायतीच्या पाणीपट्टी वसुलीत पाहायला मिळते. काही ग्रामपंचायतींचे पाणीपुरवठ्याचे नियोजन अवाक्याबाहेर असल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचे पहावयास मिळते.गावस्तरावर पाणीपट्टी वसुलीत हयगय होत असल्याने वीज देयक भरण्यासाठी ग्रामपंचायतींना कसरत करावी लागते. मुळात गावांमधील ग्राहकांकडून कडक वसुलीचे धोरण ग्रामपंचायतीने स्वीकारल्यास देयक थकीत पडण्याचे प्रमाणही कमी होईल. परंतु, तसे होताना दिसत नाही.ग्रा.पं.कडे येरझारा, देयक भरण्यास चालढकलदंड, व्याज माफ आणि ५० टक्के रकमेत हप्ते पाडून देण्याची योजना आणली होती. त्याला बहुतांशी ग्रामपंचायतीतून प्रतिसादही मिळाला. परंतु, दोन वर्षापासून यासंदर्भात योजना राबविली नाही. परिणामी, थकबाकीचा आलेख वाढतच गेला. वसुलीसाठी गावागावातील वायरमन ग्रामपंचायतींकडे येरझऱ्या मारतात. परंतु, त्यांनाही अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. कारवाईचा इशारा दिल्यानंतर काही रक्कम भरली जाते. वीजपुरवठा सुरळीत करून घेतल्यानंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ अशीच परिस्थिती निर्माण होते.काही ग्रामपंचायती चालू वीज देयकही भरण्याकडे दुर्लक्ष करतात. थकीत राहू द्या, आपण चालू तरी भरा, अशी महावितरणने कितीही हाक दिली तरीही अशा ग्रामपंचायतींवर कोणताच परिणाम होत नाही. आता थकबाकीची रक्कम ३ कोटीवरे पोहोचल्याने महावितरणने हा प्रश्न गांभीर्याने घेतला आहे. कर्मचाऱ्यांकडून ग्रामपंचायतींना सूचना दिल्या जात आहेत. प्रतिसाद मिळाला नाही तर नोटीस पाठवून कारवाईचा इशारा दिला जाईल, त्यानंतरही थकबाकी भरली नाही तर वीज पुरवठा खंडीत करण्याची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.चालू वीज देयकांची वसुली करण्यात येत आहे. जी थकीत रक्कम आहे. त्याची वसुली करण्यासाठी धडक वसुली मोहिम राबविण्यात येत आहे. नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. जे ग्राहक थकीत वीज देयके भरणार नाहीत, त्यांची वीज खंडीत करण्यात येईल.डॉ. सुरेश वानखेडे, अधीक्षक अभियंता, महावितरण

टॅग्स :mahavitaranमहावितरण