अन् शेतकऱ्याने केली चक्क बैलबंडीवरुन तुरीला फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 05:00 AM2020-11-25T05:00:00+5:302020-11-25T05:00:21+5:30

यावर्षी शेतामध्ये सोयाबीन व तूर पिकाची लागवड शेतकऱ्याने केली होती. मात्र, सोयाबीनला शेंगा न लागल्याने सर्व सोयाबीन शेतकरी रणजित ढगे यांनी उपटून फेकले. त्यांनी केलेला  लागवड खर्च देखील निघाला नाही. सोयाबीन उपटून फेकल्याने शेतात फक्त पाच एकरात तूरीचे पीक राहिले.  यावर्षी पाणी जास्त झाल्याने तुरीचे झाडांचाी मोठ्या प्रमाणात वाढ झाल. तुरीची वाढ माणसापेक्षाही जास्त असल्याने फवारणी करण्यासाठी मजूर तयार नाही. त्यामुळे तुरी पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. 

Another farmer sprayed the trumpet from a bullock cart | अन् शेतकऱ्याने केली चक्क बैलबंडीवरुन तुरीला फवारणी

अन् शेतकऱ्याने केली चक्क बैलबंडीवरुन तुरीला फवारणी

Next
ठळक मुद्देकिडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जुगाड

  सतीश काळे
    लोकमत न्यूज नेटवर्क
अल्लीपूर : शेतातील तुरीची झाडे माणसांऐवढी वाढल्याने फवारणीसाठी मजूर तयार नसल्याने युवा शेतकऱ्याने जुगाड लावून चक्क बैलबंडीवरुन तुरीच्या झाडांना फवारणी करुत किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवीन शक्कल लढविली आहे. त्याच्या या कसरतीमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये कुतुहलाचा विषय ठरला आहे. 
यावर्षी शेतामध्ये सोयाबीन व तूर पिकाची लागवड शेतकऱ्याने केली होती. मात्र, सोयाबीनला शेंगा न लागल्याने सर्व सोयाबीन शेतकरी रणजित ढगे यांनी उपटून फेकले. त्यांनी केलेला  लागवड खर्च देखील निघाला नाही. सोयाबीन उपटून फेकल्याने शेतात फक्त पाच एकरात तूरीचे पीक राहिले. 
यावर्षी पाणी जास्त झाल्याने तुरीचे झाडांचाी मोठ्या प्रमाणात वाढ झाल. तुरीची वाढ माणसापेक्षाही जास्त असल्याने फवारणी करण्यासाठी मजूर तयार नाही. त्यामुळे तुरी पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला आहे. 
त्यामुळे पीक खराब होवू नये, म्हणून युवा शेतकरी रणजित ढगे यांनी जुगाड करीत टेक्नॉलाॅजीने नवीन शक्कल लढवून स्वत:ची बैलबंडी जुतून वडिल गुणवंत ढगे यांना सोबत घेत शेतातील तूरीच्या पिकावर संपूर्ण पाच एकरात फवारणी केली असून अळीच्या अटॅक पासून पीकांचे संरक्षण केले. दुसऱ्यावर अवलंबून न राहता आलेल्या प्रत्येक परिस्थितीवर मात करण्याचा संदेश युवा शेतकऱ्याने दिला असून त्याच्या या नव्या जुगाडाची चर्चा लगतच्या गावातही असून शेतकरी पाहणीकरीता येत आहे.

Web Title: Another farmer sprayed the trumpet from a bullock cart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.