शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
2
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
4
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
5
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
6
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
7
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
8
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
9
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
10
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
11
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
12
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
13
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
14
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
15
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
16
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
17
शनिवारी, रविवारी मध्यरात्री मेगाब्लॉक; मध्य रेल्वे सेवा पूर्णत: बंद राहणार, मेल-एक्स्प्रेसना फटका
18
इराणची नाकेबंदी सुरूच, ट्रम्प यांचा 'नवा प्लॅन'; संघर्ष पुन्हा चिघळण्याची चिन्हे
19
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
20
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन कार्यपध्दती ठरते त्रासदायक

By admin | Updated: June 22, 2017 00:39 IST

नुकताच शालेय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरु झाली आहे.

दाखल्यांकरिता पालकांची धावपळ लोकमत न्यूज नेटवर्क पुलगाव : नुकताच शालेय माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षांचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची लगबग सुरु झाली आहे. प्रवेशाकरिता लागणारे दाखले व कागदपत्रे मिळविताना पालकांना मात्र चांगलीच पायपीट करावे लागत आहे. सर्व शासकीय सेवा आॅनलाईन करण्यात आल्या असून लिंक फेल असल्यास कागदपत्र मिळत नाही. सद्यस्थितीत आॅनलाईन प्रणाली नागरिकांकरिता डोकेदुखीची ठरत आहे. येथील नायब तहसीलदार कार्यालयात श्रावळबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, घरकूल योजनेचे लाभार्थी, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, क्रिमीलेअर दाखला, शेतीचा फेरफार, सातबाराचा उतारा याकरिता विद्यार्थी, पालकांसह शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. कधी नायब तहसीलदाराची अनुपस्थिती तर कधी लालफितशाहीचे धोरण यामुळे या कार्यालयात कामासाठी आलेल्या ग्रामस्थ किंवा विद्यार्थ्यांना आपल्या कामासाठी वारंवार चकरा माराव्या लागतात. प्रशासनातील सर्व सेवा आॅनलाईन झाल्या आहेत. प्रवेश परीक्षेचे अर्ज असो किंवा नोकरीचा अर्ज, पोलीस स्टेशनची तक्रार असो किंवा शिष्यवृत्तीचा अर्ज, सातबाराचा उतारा देखील आॅनलाईन मिळतो. याकरिता नायब तहसीलदार कार्यालयात ग्रामदुत सेवा केंद्र सुरू करण्यात आले आहे. या सेवा केंद्रात अत्याधुनिक सुविधा असून आवश्यक दस्ताऐवज मिळविता येतात. विविध प्रमाणपत्रासाठी शासकीय नियमानुसार शुल्क आकारले जाते. मात्र येथील सेतू केंद्रात नियमबाह्य पद्धतीने शुल्क आकारण्यात येत असल्याची ओरड पालक करीत आहे. या संदर्भात नायब तहसीलदार उल्हास राठोड यांच्यासोबत चर्चा केली असता शासकीय शुल्कापेक्षा जास्त शुल्क आकारले जात होत असेल तर कार्यवाहीचे आश्वासन त्यांनी दिले. मात्र आॅनलाईन सेवेतील व्यत्ययामुळे नागरिकांची डोकेदुखी कमी होत नसल्याचे दिसते. नागरिकांना मनस्ताप शाळा प्रवेशासाठी प्रवेश अर्जासोबत आवश्यक प्रमाणपत्रे जोडावी लागतात. याकरिता तहसीलदार कार्यालयात गर्दी होत आहे. वेळेवर प्रमाणपत्र मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांना तहसील कार्यालयाचे उबंरठे झिझवावे लागत आहे. आॅनलाईन सेवा सुरू करुनही हा प्रकार कायम आहे. आॅनलाईन कार्यपध्दतीमुळे कागदपत्र मिळविण्यासाठी संपूर्ण दिवस खर्ची घालावा लागत असल्याने नागरिक त्रस्त आहेत.