आनंद निकेतनच्या शिक्षकांनी केली शेतात पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:00 AM2020-07-06T05:00:00+5:302020-07-06T05:00:49+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या कर्मभूमीत आजही विद्यार्थ्यांना स्वच्छता, स्वावलंबन आणि स्वदेशीची शिकवण देण्याचे कार्य आश्रम परिसरालगतच्या नयी तालिममध्ये सुरु आहेत. येथील आनंद निकेतन विद्यालयातून विद्यार्थ्यांना शेताची पेरणी, लावणी, भाजीपाल्याचे उत्पादन, व्यवहार, अर्थकारण यासोबतच पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमही शिकविला जातो.

Anand Niketan's teachers planted in the field | आनंद निकेतनच्या शिक्षकांनी केली शेतात पेरणी

आनंद निकेतनच्या शिक्षकांनी केली शेतात पेरणी

googlenewsNext
ठळक मुद्देसेवाग्रामात कृतीयुक्त शिक्षण : विद्यार्थ्यांच्या अनुपस्थित होतेय शिवणकाम, शेतीकाम

लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : चार भिंतीच्या आत विद्यार्थ्यांचे विश्व बंदिस्त न करता निसर्गाच्या सानिध्यात कृतीयुक्त शिक्षण देण्याचे कार्य सेवाग्राम येथील आनंद निकेतन विद्यालयात अविरत सुरु आहे. यावर्षी लॉकडाऊनमुळे विद्यार्थी शाळेत पोहोचू न शकल्याने शिक्षकांनीच शाळेत उपस्थित राहून त्यांच्या शेतामध्ये लावणी व पेरणीची कामे आटोपली आहेत.
राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या कर्मभूमीत आजही विद्यार्थ्यांना स्वच्छता, स्वावलंबन आणि स्वदेशीची शिकवण देण्याचे कार्य आश्रम परिसरालगतच्या नयी तालिममध्ये सुरु आहेत. येथील आनंद निकेतन विद्यालयातून विद्यार्थ्यांना शेताची पेरणी, लावणी, भाजीपाल्याचे उत्पादन, व्यवहार, अर्थकारण यासोबतच पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमही शिकविला जातो. कृतीशिल शिक्षण पद्धतीचा अवलंब करणाऱ्या या विद्यालयात लॉकडाऊनमुळे यावर्षी विद्यार्थी येऊ न शकल्याने शिक्षकवृंद शेतात लावणी, पेरणी आणि मास्क बनविण्याचे काम करीत आहे. लॉकडाऊनच्या काळात शाळा सुरु न झाल्याने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आवश्यक लावणी, पेरणीची कामे विद्यार्थ्यांविना शिक्षकवृंदानीच केली. त्यांनी कापूस, तूर, वेलवर्गीय भाजीपाला आदींची लावणी केली.

शेतीशिक्षण हा नयी तालिम शिक्षण प्रणालीचा एक भाग आहे. येथे शेती कामातून अनेक विषय शिकविल्या जातात. सध्या विद्यार्थी नसल्याने शेतीची कामे थांबविता येत नाही. तसेच मास्कचीही गरज असल्याने त्यावर भर देण्यात आला. शिक्षकांनाही सृजनात्मकतेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. शिक्षकवृंदानीच विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत कामे सुरु केली आहे.
- सुषमा शर्मा, संचालिका आनंद निकेतन विद्यालय, सेवाग्राम.

Web Title: Anand Niketan's teachers planted in the field

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.