शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

व्हीआयपी मार्गाची दुर्दशा कायमच

By admin | Updated: June 9, 2014 23:48 IST

सिव्हिल लाइन परिसरातील व्हीआयपी मार्गाच्या डांबरीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे या मार्गाची डागडुजी कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

वर्धा :  सिव्हिल लाइन परिसरातील व्हीआयपी मार्गाच्या डांबरीकरणाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे या मार्गाची डागडुजी कधी होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. इंदिरा गांधी पुतळ्याशेजारी कोपर्‍यात अर्धवट डांबरीकरण करण्यात आले. मात्र उर्वरित मार्ग जैसे थे ठेवण्यात आला आहे. सिव्हिल लाइन भागात अनेक अधिकार्‍यांची निवासस्थाने आहे. शिवाय शासकीय कार्यालये, शाळा महाविद्यालये आहेत. दररोज शेकडो वाहनांचे या मार्गाने आवागमन सुरु असते. अनेक दिवसांपासून या मार्गाची वाताहत झालेली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहे. त्यामुळे रस्त्याची पुरती चाळणी झालेली आहे. वाहनचालकांना या मार्गाने जाताना तारेवरची कसरत करावी लागते. रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात अनेकदा येथे अपघात झाले आहेत. कित्येक दिवसांपासून रस्त्याची अशी अवस्था झालेली असताना याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याचे दिसते.सकाळपासूनच या रस्त्याने मोठी वर्दळ असते. शासकीय विश्रामगृह, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालयाकडे याच मार्गाने जावे लागते. विश्रामगृहात शासनाचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी आदींचे नित्याचे येणे असते. सेवाग्राम येथील महात्मा गांधींच्या आश्रमाला याच मार्गाने जोडण्यात आले आहे.विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालयही याच मार्गावर असताना या कार्यालयातील अधिकार्‍यांचे रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष कसे जात नाही, असा प्रश्न येथून मार्गक्रमण करणार्‍यांकडून उपस्थित कोल जात आहे. इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याशेजारी केवळ डांबरीकरणाचा पॅच मारण्यात आला. मात्र उर्वरित रस्त्याचे बांधकाम करण्याचा संबंधित विभागाला विसर पडला. या रस्त्याच्या दुरुस्तीविषयी जिल्हा प्रशासनाची कायम उदासिनता असल्याचे स्पष्ट होत आहे. पावसाळ्यात या रस्त्याची पुन्हा वाताहत होणार असल्याचे चित्र आहे.(शहर प्रतिनिधी)