शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
2
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
3
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
4
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
5
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
6
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
7
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
8
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
9
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
10
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
11
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
12
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
13
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
14
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
15
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
16
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
17
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
18
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
19
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
20
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून

युवतीचा पाणीदार गावासाठी एकाकी लढा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 9:57 PM

सेलू तालुक्यात अनेक गावांत लोक गाव पाणीदार बनविण्यासाठी श्रमदान करीत असताना अस ही एक गाव आहे ज्या गावातील नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असताना एक युवतीने गाव पाणीदार बनविण्यासाठी एकाकी लढा देत आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आता वानरविहिरात श्रमदानासाठी सरसावले

लोकमत न्यूज नेटवर्कघोराड : सेलू तालुक्यात अनेक गावांत लोक गाव पाणीदार बनविण्यासाठी श्रमदान करीत असताना अस ही एक गाव आहे ज्या गावातील नागरिकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली असताना एक युवतीने गाव पाणीदार बनविण्यासाठी एकाकी लढा देत आहे.हिंगणी ग्राम पंचायत अंतर्गत येत असलेल्या जंगल व्याप्त भागात वानरविहिरा हे एक गाव. आपले ही गाव पाणीदार व्हावे अशी खूणगाठ मनाशी बाळगून स्वत: गावातील नागरिकांना श्रमदानाच महत्त्व पटवून दिले पण कोणीही पुढाकार घेत नाही म्हणून याच गावातील युवती प्रिया नेहारे हिने एकटीने प्रथम श्रमदानास सुरूवात केली काही दिवस ती एकटीच श्रमदान करीत होती. १८०० घनमीटर श्रमदानाच उद्दिष्ट पूर्ण होणार नाही याची कल्पना तिला आली कोणीही तिला साथ दिली नाही पण ती एकटीच श्रमदान करीत असल्याचे सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणारे वीर भगतसिंग बहुद्देशीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना कळले आणि त्यांनी वानरविहिरा गावाकडे धाव घेतली संस्थेचे पदाधिकारी तिच्या मदतीला रोज सकाळी जाऊन श्रमदान करीत आहे त्याच बरोबर काही विविध युवा संघटनाही सहभागी होऊ लागल्या ते गाव पाणीदार होईलच असा आत्मविश्वास आता प्रियाला येऊ लागला त्या युवतीच्या कार्याची दखल सोशल मीडियाने घेतली तिचे अभिनंदन होत आहे.महिलांचा पुढाकारपावसाचे पाणी मुरवून गाव कायमस्वरूपी पाणीदार बनविण्यासाठी जिल्ह्यातील अनेक गावात स्पर्धा लागली आहे. या कामात तरूणींचा सहभाग मोठा असल्याचे दिसून येत आहे. गावात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिलाही श्रमदानासाठी सरसावल्या आहेत. वर्धा येथील सामाजिक संघटनांचे पदाधिकारी काही गावांना आर्थिक मदत देत आहे. त्यामुळे जलसंधारणाच्या कामात गावकऱ्यांचा उत्साह सतत वाढत आहे. प्रियाला सध्या वानरविहिराची वाघीण अशी उपमा दिली आहे.

टॅग्स :Waterपाणी