शहरं
Join us  
Trending Stories
1
मानखुर्दमध्ये महापालिकेच्या कामादरम्यान भीषण अपघात; क्रेन कोसळून पोलीस हवालदाराचा दुर्दैवी मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
"३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले!
4
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
5
पोलिसांची एक 'टायपिंग मिस्टेक' आणि पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन; अटकच ठरवली बेकायदेशीर
6
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' तारखेला जन्मलेले लोक म्हणजे विश्वासाचं मूर्तीमंत प्रतीक!
7
क्रिकेटमध्ये नवा इतिहास! ६ चेंडूत ६ गडी बाद; गोलंदाजाने अवघ्या काही क्षणात फिरवला सामना (VIDEO)
8
कपडे होणार स्वस्त! सरकार ११ टक्के टॅक्स हटवण्याच्या विचारात; इराण संकटादरम्यान कंपन्यांना दिलासा देणार?
9
बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क!
10
सावधान! बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने खरंच मृत्यू होतो का? डॉक्टरांनीच सांगितलं 'सत्य'
11
न्यायाधीशांचा पावरफुल आदेश, पण सिस्टीम पडली भारी! फक्त एका तासात त्यांचीच हकालपट्टी; पाकिस्तानात मोठा राडा
12
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
13
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
14
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
15
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
16
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
17
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
18
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
20
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
Daily Top 2Weekly Top 5

घरपोच सिलिंडर देण्याची कर्मचाऱ्यांना एलर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 05:00 IST

घरपोच स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर देण्याच्या नावाखाली २५ ते ३० रूपये भरलेल्या सिलेंडरच्या दरा व्यतिरिक्त ग्राहकांकडून जास्त वसुल केले जात आहे. त्याशिवाय ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडर कर्मचाऱ्यांकडून दिल्या जात नाही. भरलेले सिलिंडर घरापर्यंत नेण्यास या कर्मचाऱ्यांना मदत मागितली असता हे माझे काम नाही असे उत्तर कर्मचाऱ्यांकडून दिल्या जाते. प्रसंगी अरेरावीची भाषा वापरली जाते.

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त रक्कम घेतली जाते : सिलिंडरचे वजनही केल्या जात नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककेळझर : घरपोच स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर देण्याच्या नावाखाली २५ ते ३० रूपये भरलेल्या सिलेंडरच्या दरा व्यतिरिक्त ग्राहकांकडून जास्त वसुल केले जात आहे. त्याशिवाय ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडर कर्मचाऱ्यांकडून दिल्या जात नाही. भरलेले सिलिंडर घरापर्यंत नेण्यास या कर्मचाऱ्यांना मदत मागितली असता हे माझे काम नाही असे उत्तर कर्मचाऱ्यांकडून दिल्या जाते. प्रसंगी अरेरावीची भाषा वापरली जाते. त्यामुळे ग्राहकांना गॅसने भरलेले अवजड सिलिंडर घरापर्यंत नेण्याकरिता कसरत करावी लागते. यात महिला व वृध्दांची मोठी परवड होत आहे.सिंदी (रेल्वे) येथील ‘श्री जी’ गॅस एजन्सीव्दारे केळझरसह १० ते १५ गावांना गॅस सिलेंडरचा पुरवठा केल्या जातो. याकरिता चारचाकी वाहनातून ड्रायव्हरसह दोन कर्मचारी गावागावात जाऊन गॅस सिलिंडरचे वाटप करतात. वाहनचालका व्यतिरीक्त दुसरा कर्मचारी वाहनातून ग्राहकांना गॅस भरलेले सिलिंडर देण्याचे व रिकामे सिलिंडर वाहनात ठेवण्याचे काम करतो. या कर्मचाऱ्यांकडून ग्राहकांशी अरेरावीची भाषा वापरल्या जात असल्याने ग्राहकांमध्ये सध्या या कर्मचाºयाबाबत रोष व्यक्त केल्या जात आहे. गॅस सिलिंडर वितरित करणारे कर्मचारी नागरिकांना रस्त्यावर सिलिंडर देऊन देतात. बरेच नागरिक ते सिंलिंडर रस्त्यावरून घरगळत आपल्या घराकडे नेतात. यात वयोवृध्द नागरिक, महिला यांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो.सिलिंडर वाहतूक करणारे वाहनही असुरक्षितग्राहकांना गॅसने भरलेले सिलिंडर देतेवेळी सिलिंडरचे वजन करूनच ते ग्राहकांना देण्याचा नियम असतांना या कर्मचाऱ्यांडून किंबहुना ‘श्री जी’ गॅस एजन्सीकडून सिलिंडरचे वजन करून ग्राहकांना दिल्या जात नाही. त्यामुळे आपल्याला दिले गेलेल्या सिलिंडर मध्ये गॅस कमी तर नाही ना ? अशी शंका ग्राहकांमध्ये असते.ज्या वाहनातून गॅस सिलिंडरची ने-आण केल्या जाते त्या वाहनाचा रंग निळा असावा व वाहनात अग्निशामक यंत्र असावे असा नियम आहे. परंतु याठिकाणी यासर्व नियमांची पायमल्ली होतांना दिसते. यासर्व मनमानी कारभाराकडे जिल्हा पुरवठा विभागाकडून हेतूपुरस्पर कानाडोळा केल्या जात आहे. ‘श्रीजी’ गॅस एजन्सीने ग्राहकांशी उध्दट वर्तणूक करणाऱ्या अशा कर्मचाऱ्यांवर लगाम लावण्याची मागणी ग्राहकांकडून केल्या जात आहे.

टॅग्स :Socialसामाजिक