शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

सर्वच शेतकऱ्यांना मिळणार जीवनदायी योजनेचा लाभ

By admin | Updated: June 11, 2016 02:33 IST

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील सर्वच शेतकरी कुटूंबांना याचा लाभ मिळणार आहे.

शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबाना लाभवर्धा : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यातील सर्वच शेतकरी कुटूंबांना याचा लाभ मिळणार आहे. वर्धा जिल्ह्याचाही या योजनेत समावेश असून शुभ्र शिधापत्रिका धारक शेतकरी कुटूंबांना त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या शिधापत्रिका तसेच सातबाराच्या उताऱ्यावर योजनेचा लाभ घेता येईल. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत औरंगाबाद, अमरावती व नागपूर विभागातील वर्धा या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटूंबांना लाभ देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. या योजनेची अमलबजावणी सुरू झाली असून शेतकरी कुटूंबांनी योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे. शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटूंबांना त्याच्याकडे उपलब्ध असलेल्या शिधापत्रिका तसेच सातबाराच्या उताऱ्यावर योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच ज्या शेतकरी कुटूंबांकडे कोणतीही शिधापत्रिका नाही अशा लाभार्थ्यांस फक्त त्यांच्याकडे असलेल्या सातबाराच्या उताऱ्यावर योजनेचा लाभ घेता येईल. शेतकरी कुटूंबांतील कोणत्याही लाभार्थ्यांस विमा कंपनीने लाभ नाकारू नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहे. शेतकरी कुटूंबांतील सदस्याचे नाव शिधापत्रिका किंवा सातबाराच्या उताऱ्यात समाविष्ट नसल्यास सदस्य हा त्या कुटूंबांतील असल्याचे संबंधित महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. लाभार्थी कुटूंबाचा व्यवसाय हा फक्त शेती एवढाच असणे आवश्यक राहील. शासकीय अथवा निमशासकीय सेवेत असलेल्या शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकऱ्याला योजनेचा लाभ नाही.(शहर प्रतिनिधी)