शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
4
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
5
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
6
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
7
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
8
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
9
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
10
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
11
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
12
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
13
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
14
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
15
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
16
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
17
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
18
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
19
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
20
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
Daily Top 2Weekly Top 5

दारू, जुगार, सट्टा सुरूच; पोलीस हतबल

By admin | Updated: May 23, 2014 00:08 IST

वर्धा जिल्हा दारूबंदी जिल्हा आहे. पोलीसही त्यादृष्टीने प्रयत्नरत आहेत; पण जिल्ह्याच्या सभोवताल असलेल्या जिल्ह्यांमध्ये दारू खुली आहे. शिवाय वर्धा जिल्ह्यात दाखल होण्याकरिता अनेक

 ंआकोली : वर्धा जिल्हा दारूबंदी जिल्हा आहे. पोलीसही त्यादृष्टीने प्रयत्नरत आहेत; पण जिल्ह्याच्या सभोवताल असलेल्या जिल्ह्यांमध्ये दारू खुली आहे. शिवाय वर्धा जिल्ह्यात दाखल होण्याकरिता अनेक चोरट्या वाटा आहेत़ यामुळे देशी-विदेशी दारू सहज उपलब्ध होत असल्याचे दिसून येते. शिवाय जुगार, सट्टापट्टीलाही येथे मोठाच वाव आहे़ असे असले तरी पोलिसांना कायदा व सुव्यवस्था सांभाळत असताना अवैध व्यावसायिकांकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्हा पोलीस दलात प्रामाणिकपणे काम करणार्‍या कर्तबगार अधिकार्‍यांची वाणवा नाही; पण अवैध व्यवसाय हेच पोलिसांचे उद्दीष्ट राहू शकत नाही. पोलिसांना मंत्र्यांची, पोलीस ठाण्यामध्ये दाखल होणारे विविध स्वरूपाचे गुन्हे व त्यासाठी प्राधान्याने द्यावा लागणारा वेळ यामुळे अवैध व्यावसायिकांचे चांगलेच फावले आहे. शिवाय दारूबंदी व जुगाराचे कायदे कठोर नाहीत़ आज आरोपीला पकडल्यानंतर दुसर्‍याच दिवशी त्याला जामीण मिळतो़ यामुळे तो अवैध व्यावसायिक बाहेर आल्यानंतर पुन्हा धंद्याकडे वळतो. यामुळे पोलीसही कारवाई करून व कागद पांढर्‍याचे काळे करून थकले आहेत़ वर्धा जिल्ह्याच्या सिमेला लागून असलेल्या अमरावती, यवतमाळ, नागपूर व चंद्रपूर या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूचा पुरवठा होतो. गुन्हे शाखा, विविध पोलीस ठाण्याचे अधिकारी दारूसाठा पकडतात; पण जिल्ह्यात चोरट्या मार्गाने येणारी दारू थांबता थांबत नाही, ही वस्तुस्थिती आहे. जुगार व दारूमुळे पालक चिंतेत आहेत़ व्यवसनाधिनतेमुळे भांडण-तंटे यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ यामुळे कुटुंबातील सदस्यांना मनस्ताप सहन करावा लागतो. कौटुंबिक कलह व भांडणांचे जेवढे गुन्हे पोलिसांत दाखल होतात, त्यात व्यसनाधिनता हेच कारण असल्याचे अनेकदा समोर आले आहे. खरांगणा पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या आकोली व परिसरातही सध्या अवैध दारूविक्री, सट्टापट्टी व जुगाराला उधान आल्याचे दिसते़ चौकांमध्ये खुलेआम आटोमध्ये जुगार खेळला जातो़ पानठेल्यांसमोर चालणारा हा प्रकार अनेकांना दिसतो; पण ते काहीही करू शकत नाही़ परिसरात सर्वत्र दारू सहज उपलब्ध होते़ यामुळे मद्यपिंच्या संख्येतही वाढ झाली आहे़ मद्यपिंच्या लोटांगणांमुळे सध्या जिल्ह्यातील दारूबंदी हटल्याचेच चित्र निर्माण झाले आहे़ ग्रामीण भागात दारूविक्रेत्यांच्या घरांसमोर मद्यपिंच्या रांगा दिसून येतात़ खरांगणा (मो़) येथे तर सट्टापट्टी व्यवसायाचा छापील पावत्या राजरोसपणे दिल्या जात आहेत़ सध्या हा व्यवसाय आॅनलाईन झाला आहे़ इंटरनेटच्या माध्यमातून संगणकावरच आकडे उघडले जात असल्याने व्यवसायाला तेजी आल्याचे दिसते़ वर्धा जिल्ह्यातील सट्टा व्यवसायही तेजीतच दिसतो़ कारवाई करूनही दारू, जुगार कमी होत नसल्याने पोलीस प्रशासनही सध्या हतबल झाल्याचेच दिसून येते़ जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याची दखल घेत अवैध व्यवसायावर आळा घालावा, मद्यपिंना चोप द्यावा व दारूविके्रत्यांनाही वठणीवर आणावे, अशी प्रतिक्रिया सार्वत्रिकरित्या नागरिकांतून उमटत आहेत़(वार्ताहर)