शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

व्यसनी पतीने केली पत्नीची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : संशयीत वृतीच्या तसेच दारूचे व्यसन असलेल्या पतीने पत्नीची हत्या केली. ही घटना कारला चौक ...

ठळक मुद्देकारला चौक परिसरातील घटना : रामनगर पोलीस ठाण्यात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : संशयीत वृतीच्या तसेच दारूचे व्यसन असलेल्या पतीने पत्नीची हत्या केली. ही घटना कारला चौक भागातील नटाळा पुनर्वसन येथे बुधवारी रात्री उशिरा घडली. रेखा देवराव मोहिजे (५०), असे मृतक महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मृतक महिलेच्या मुलीच्या तक्रारीवरून रामनगर पोलीस ठाण्यात आरोपी देवराव मोहिजे याच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्राप्त माहितीनुसार, बुधवारी रात्री १० वाजताच्या सुमारास मुलगी घरी परतल्यानंतर ही घटना तिच्या निदर्शनात आली. त्यानंतर रामनगर पोलिसांना माहिती देण्यात आली. घटनेनंतर आरोपी पती देवराव मोहिजे याने घटना स्थळावरुन यशस्वी पळ काढला. घटनेनंतर पसार झालेल्या आरोपीच्या शोधार्थ रामनगर पोलिसांच्या तीन चमू रवाना करण्यात आल्या होत्या. दरम्यान दसऱ्याच्या दिवशी रामनगर पोलिसांना आरोपी जखमी अवस्थेत गवसला. त्याच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी आणि मृतक यांच्यात नेहमी छोट्या-छोट्या करणावरुन भांडण होत होते. बुधवारी छोट्याशा कारणावरून झालेला वाद विकोपाला जाऊन त्याचे हाणामारीत रूपांतर झाले. याच वेळी आरोपीने रेखाचे डोके जमिनिवर ठेचुन तिची हत्या केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तापसात पुढे आले आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्नरामनगर पोलीस रेखा मोहिजे हिच्या मारेकºयाचा शोध घेत असतानाच आरोपी देवराव मोहिजे याने स्वत:वर चाकूने वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न ेकेला. आत्महत्येचा हा प्रयत्न देवराव याने वर्धा शहरातील अंबिका चौक परिसरात केला. त्यानंतर त्याला परिसरातील नागरिकांच्या मदतीने तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी देवराव मोहिजे याच्याविरुद्ध वर्धा शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सन २०१६ मध्ये हाणामारीचा गुन्हासन २०१६ मध्ये मृतक रेखा मोहिजे यांच्या तक्रारीवरुन देवराव मोहिजे यांच्याविरुद्ध भादंविच्या ३२४ अन्वये पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता, असेही पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.आरोपी हा महावितरणचा सेवानिवृत्त कर्मचारीसदर घटनेतील आरोपी देवराव मोहिजे हे महावितरण कंपानीतील सेवानिवृत्त लाईनमन आहेत. त्यांना दारूच्या व्यसनाने ग्रासल्याचे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. शिवाय ते संशयी वृत्तीचे असल्याचेही सांगण्यात आले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी वर्धा शहरातील एका खासगी कंपनित सुरक्षारक्षक म्हणून काम करण्यास सुरूवात केली. तसेच ते या खाजगी कंपनीत सध्या कार्यरत आहेत.धीरज निघाला भारतीचा मारेकरीपुलगाव येथील हत्येचे रहस्य उलगडलेलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पुलगाव येथील भारती जांभुळकर हत्या प्रकरणातील आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. मागील सुमारे सव्वा महिन्यापासून भारतीचा मारेकरी पोलिसांची दिशाभूल करीत होता. अखेर खात्रिदायक माहिती हाती लागल्यानंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या असून पती धीरज यानेच पत्नी भारतीची हत्या केल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात पुढे आले आहे.प्राप्त माहितीनुसार, रेल्वे वसाहत, पुलगाव येथील रहिवासी भारती जांभुळकर हिचा मृतदेह तिच्याच घरात १५ सप्टेंबरला दुपारी मिळाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी मृतक भारतीचे पती धीरज यांच्या तक्रारीवरून अज्ञात मारेकºयाविरुद्ध पुलगाव पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीच्या शोधार्थ स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन तर पुलगाव पोलिसांच्या तीन चमू रवाना करण्यात आल्या होत्या. महिना लोटला तरी पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले नसल्याने व पुलगाव शहरात उलट-सुटल चर्चेला उधान आले होते. या प्रकरणाचा छडा लावताना पुलगावचे ठाणेदार मुरलीधर बुराडे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांनी आपसात ताळमेळ ठेवून वरिष्ठ अधिकाºयांच्या मार्गदर्शनात तपासाला गती दिली. दरम्यान काही खात्रिदायक माहिती पोलिसांच्या हाती लागताच त्याची शहानिशा करण्यात आली. शिवाय पुरावेही गोळा करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष साक्षदार, फिर्यादी व संशयीत आरोपी यांचे संबंधातील व्यक्ती, नातलग, मित्र, आसपासचे परिसरात राहणारे सराईत गुन्हेगार, परिसरातील नागरिक आदींना विचारपूस केल्यानंतर पुन्हा एखदा तक्रारकर्ता असलेल्या धीरला पोलिसांनी विचारपूस केली. त्यावेळी सुमारे महिन्याभºयापासून पोलिसांची दिशाभूल करणाºया धीरजने गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुलगाव पोलिसांनी न्यायालयात हजर करून त्याची २२ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळविली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिनेशकुमार कोल्हे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे, पुलगावचे ठाणेदार मुरलीधर बुराडे, पीएसआय महेंद्र इंगळे, सहा. फौजदार नामदेव किटे, पोलीस शिपाई सलाम कुरेशी, स्वप्नील भारद्वाज, मनीषा श्रीवास, जगदीश डफ, सचिन खैरकार, विवेक बन्सोड, रवींद्र मुजबैले, अमोल आत्राम, किसना कास्देकर, विकास मुंडे आदींनी केली.अनैतिक संबंध विकोपालाभारती जांभुळकर हिची हत्या अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारी