शहरं
Join us  
Trending Stories
1
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
2
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
3
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
4
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
5
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
6
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
7
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
8
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
9
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
10
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
11
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
12
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
13
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
14
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
15
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
16
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
17
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
18
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
20
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
Daily Top 2Weekly Top 5

५.४५ कोटींचा निधी खर्चूून होणार ‘हरित वर्धा’चा उद्देश साध्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

वर्धा नगर परिषदेचे सन २०१९-२० चे सुधारीत व सन २०२०-२१ चे प्रस्तावित अर्थसंकल्प अंदाजपत्रक मंजुरीसाठी न.प.च्या अण्णाभाऊ साठे सभागृहात गुरूवारी विशेष सभा पार पडली. या बैठकीला नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदिपसिंग ठाकुर, न.प.चे मुख्याधिकारी प्रदिप जगताप तसेच प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

ठळक मुद्देनगर पालिकेने अर्थसंकल्पात दिली हिरवी झेंडी

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : स्वच्छ सर्वेक्षण या स्पर्धेत उल्लेखनीय कार्य करून दोन वेळा पुरस्कार पटकाविणाऱ्या वर्धा न.प.ने पुढील आर्थिक वर्षात स्वच्छ शहरासह हरित शहराला प्राधान्य दिले आहे. त्यासाठी वर्धा न. प. ने अर्थसंकल्प २०२०-२१ मध्ये तब्बल ५ कोटी ४५ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. सदर विषयाला गुरूवारी पार पडलेल्या बैठकीत हिरवीझेंडीही मिळाली आहे.वर्धा नगर परिषदेचे सन २०१९-२० चे सुधारीत व सन २०२०-२१ चे प्रस्तावित अर्थसंकल्प अंदाजपत्रक मंजुरीसाठी न.प.च्या अण्णाभाऊ साठे सभागृहात गुरूवारी विशेष सभा पार पडली. या बैठकीला नगराध्यक्ष अतुल तराळे, न.प. उपाध्यक्ष प्रदिपसिंग ठाकुर, न.प.चे मुख्याधिकारी प्रदिप जगताप तसेच प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. याच बैठकीत शहरातील विविध उद्याने, चौक, दुभाजकांचे सौंदर्यीकरण तसेच फेरीवाला क्षेत्र विकासासाठी ३ कोटी ५५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. इंदिरा गांधी उद्यान व इतर उद्यानात हरिष क्षेत्राच्या विकासासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. इसाजी ले-आऊट मधील राजे संभाजी महाराज बगीचा व परिसर विकासासाठी २० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मागील वर्षातील पूर्ण करावयाच्या प्रकल्प या शिर्षकाखाली विविध उद्यान विकास (आमदार/खासदार निधी) साठी २० लाखांचा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान विकासासाठी १ कोटींच्या निधीची तरतूद करून त्याला मंजुरी देण्यात आली आहे.वृक्ष करातून मिळणार केवळ २१ लाखनगर पालिका प्रशासन न. प. क्षेत्रातील मालमत्ताधारकांकडून विविध कर आकारते. मालमता, पाणी, विशेष स्वच्छता व वृक्ष कराच्या माध्यमातून सन २०२०-२१ मध्ये पालिकेला १४ कोटी ६ लाख ५५ हजारांचे उत्पन्न अपेक्षीत आहे. असे असले तरी हरित वर्धेचे स्वप्न बघणाºया वर्धा न.प.ला वृक्ष कराच्या नावाखाली केवळ २१ लाखांचा निधी मिळणार आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाBudgetअर्थसंकल्प