शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलवरील ‘इंटरनेट’ सुविधेचा विद्यार्थ्यांकडून गैरवापर

By admin | Updated: July 23, 2014 00:08 IST

आधुनिक काळात ग्रामीण भागातही मोबाईलवर ‘टु जी’, ‘थ्री जी’सारख्या इंटरनेट सेवा विविध कंपन्यांद्वारे दिल्या जात आहेत़ यामुळे आता प्रत्येक मोबाईलवर इंटरनेट वापरणे शक्य झाले आहे़

वायगाव (नि़) : आधुनिक काळात ग्रामीण भागातही मोबाईलवर ‘टु जी’, ‘थ्री जी’सारख्या इंटरनेट सेवा विविध कंपन्यांद्वारे दिल्या जात आहेत़ यामुळे आता प्रत्येक मोबाईलवर इंटरनेट वापरणे शक्य झाले आहे़ या इंटरनेट सुविधेचा विद्यार्थी व युवक मात्र गैरवापर करीत असल्याचे दिसून येत आहे़ पालकांनी त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे़ग्रामीण भागातील युवकदेखील इंटरनेटच्या सुविधेने वेडावल्याचे दिसून येते़ तंत्रज्ञानात झपाट्याने होणाऱ्या बदलामुळे मानवी जीवन अधिक सुखकर झाले, यात शंका नाही़ सोशल मिडीया काही युवक-युवतींच गरजच बनली आहे़ व्हाट्सअप, फेसबुक या माध्यमाने तरुणाई जगात सुरू असलेल्या सर्व घडामोडींशी कनेक्ट असते; पण तिच तरुणाई या साधनांचा मोठ्या प्रमाणात दुरूपयोग करताना दिसते़ इंटनेटद्वारे अश्लील व्हीडीओ पाहणे, अश्लील मॅसेज शेअर करणे, फोटोशी खेळ करून विक्षीप्त प्रकार करणे असे अनेक वाईट वापरही केले जातात़ आपला पाल्य मोबाईलमधील इंटरनेटचा कसा वापर करताये, हे तपासण्याची दक्षता पालक घेत नसल्याने दुरूपयोग वाढल्याचे दिसते़ व्हाट्स अप, फेसबुक व ग्रुपमध्ये कोण आहे, दररोज कशाची देवाण- घेवाण होते याची माहिती ठेवणे गरजेचे झाले आहे़ आपल्या मुला-मुलीने जगासोबत चालावे, नवीन तंत्रज्ञान त्यांना लवकर अवगत व्हावे, धकाधकीच्या या युगात त्यांनी कुठेही मागे राहू नये यासाठी अनेक पालक मुला-मुलींना महागडे मोबाईल विकत आणून देतात़ यात प्रत्येक महिन्याला इंटरनेट सुविधेसाठी रिचार्ज मारून दिले जाते; पण मुले या सुविधेचा वापर शिक्षणासंबंधी माहिती गोळा करण्यासाठी करतात वा नाही, हे तपासले जात नाही़ पालकांनी मुलांच्या मोबाईल वापराकडे लक्ष देत विकृत मनोवृत्तीला आळा घालणे गरजेचे झाले आहे़(वार्ताहर)