शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
2
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
3
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
4
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
5
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
6
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
7
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
8
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
9
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
10
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
11
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
12
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
13
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
14
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
15
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
16
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
17
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
18
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
19
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
20
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
Daily Top 2Weekly Top 5

९४.९८ टक्के गोवंशांना दिली ‘गोट फॉक्स’ लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2020 05:00 IST

जिल्ह्यात कोरोना थैमान घालत असताना गाय वर्गीय जनावरांवर ‘लम्पी स्कीन डिसीज’ हा विषाणू संसर्गाचे संकट ओढावल्याने आठही तालुक्यातील पशुपालकांच्या अडचणीत भर पडली. ही बाब पशुसंवर्धन विभागाच्या लक्षात येताच जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचे निश्चित केले. त्यानंतर तीन लाखांच्या निधीतून लम्पी स्कीन डिसीजला अटकाव घालण्यासाठी उपयुक्त ठरणारी गोट फॉक्स लसीची खरेदी करून लसीकरणास सुरूवात केली.

ठळक मुद्देलम्पी स्कीन डिसीजचा संसर्ग झालेली १०,८५६ जनावरे औषधोपचारानंतर झाली तंदुरुस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लंम्पी स्कीन डिसीजला हद्दपार करण्याचा विडा उचलणाऱ्या जिल्हा पशुसंवर्धन विभागाने आतापर्यंत जिल्ह्यातील ९४.९८ टक्के गोवंशांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून उपयुक्त ठरणारी ‘गोट फॉक्स’ ही लस दिली आहे. इतकेच नव्हे तर योग्य पद्धतीने औषधोपचार करून १० हजार ८५६ गाय वर्गीय जनावरांना बरे केले आहेत.जिल्ह्यात कोरोना थैमान घालत असताना गाय वर्गीय जनावरांवर ‘लम्पी स्कीन डिसीज’ हा विषाणू संसर्गाचे संकट ओढावल्याने आठही तालुक्यातील पशुपालकांच्या अडचणीत भर पडली. ही बाब पशुसंवर्धन विभागाच्या लक्षात येताच जिल्ह्यात विशेष लसीकरण मोहीम राबविण्याचे निश्चित केले. त्यानंतर तीन लाखांच्या निधीतून लम्पी स्कीन डिसीजला अटकाव घालण्यासाठी उपयुक्त ठरणारी गोट फॉक्स लसीची खरेदी करून लसीकरणास सुरूवात केली. शुक्रवार २५ सप्टेंबरपर्यंत ८८ हजार ६९९ गाय वर्गीय जनावरांपैकी ८४ हजार २५० गोवंशांना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. कुठल्याही पशुवैद्यकीय दवाखान्यात गाय वर्गीय जनावरांना प्रतिबंधात्मक लस देण्यास नकार दिल्या जात असल्यास त्याची थेट तक्रार जिल्हा पशुसंवर्धन विभागाला करावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.बजाज फाऊंडेशनची मदत ठरली उपयुक्तबजाज फाऊंडेशनने सामाजिक बांधिलकी जोपासत पशुसंवर्धन विभागाला गोट फॉक्स या औषधाच्या ४० हजार लस उलब्ध करून दिल्यात. शिवाय काही औषधसाठाही उपलब्ध करून दिला. वेळीच औषध उपलब्ध झाल्याने ते जिल्ह्यातील गोपालकांना दिलासा देणारे ठरले.९९ अ‍ॅक्टिव्ह जनावरांवर होतोय औषधोपचारवेळीच औषधोपचार मिळाल्याने आतापर्यंत तब्बल १० हजार ८५३ गाय वर्गीय जनावरे बरी झाली असली तरी सध्या ९९ गाय वर्गीय जनावरांवर सध्या उपचार सुरू आहेत. लवकरच ही जनावरे बरी होतील असा विश्वास तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. तर लसीकरण मोहीम उपयुक्त ठरत आहे.

टॅग्स :Healthआरोग्य