५० टक्के थकीत वीज बिल माफ
By Admin | Updated: July 12, 2014 23:50 IST2014-07-12T23:50:53+5:302014-07-12T23:50:53+5:30
राज्य शासनाने कृषी संजीवनी योजना २०१४ जाहीर केली आहे़ या योजनेच्या अंमलाकरिता महावितरणे पावले उचलेली आहेत़ या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना थकित वीज बील ५० टक्के माफ केले जाणार आहे.

५० टक्के थकीत वीज बिल माफ
कृषी संजीवनी योजनेची अंमलबजावनी सुरू
गौरव देशमुख - वायगाव (नि.)
राज्य शासनाने कृषी संजीवनी योजना २०१४ जाहीर केली आहे़ या योजनेच्या अंमलाकरिता महावितरणे पावले उचलेली आहेत़ या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना थकित वीज बील ५० टक्के माफ केले जाणार आहे. उर्वरित ५० टक्के रक्कम तीन हप्त्यात भरण्याची सवलतही देण्यात आल्याची माहिती देवळी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता विलास नवघरे यांनी दिली.
कृषी ग्राहकांनी ३१ मार्च २०१४ पर्यंतच्या मूळ थकबाकीची ५० टक्के रक्कम एकरकमी वा तीन मासिक हप्त्यामध्ये भरली तर उर्वरित ५० टक्के मूळ थकबाकी रक्कम शासन भरणार आहे. महावितरणला विद्युत कायदा २००३ कलम ६५ प्रमाणे रोखीने व समप्रमाणात अनुदान स्वरुपात अदा करण्यात येणार आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या कृषी ग्राहकांचे ३१ मार्च २०१४ रोजी थकित असलेले पूर्ण व्याज व दंड महावितरण माफ करणार असल्याचे कंपनीच्यावतीने सांगण्यात आले आहे.
योजनेतील अटी
-सहभागी कृषी ग्राहकांना १ एप्रिल २०१४ नंतरची सर्व चालू वीज बिले पूर्णपणे व नियमित भरणे आवश्यक़
-जे ग्राहक ३१ मार्च २०१४ रोजी थकबाकीदार नाहीत, अशा शेतकऱ्यांना पूढील दोन त्रैमासिक बिलामध्ये ५० टक्के माफी़
-जे ग्राहक योजनेत सहभागी होणार नाही, त्यांना अपात्र ठरविले जाईल व नियमाप्रमाणे व्याज व दंडासह पूर्ण रक्कम पुन्हा ग्राहकाच्या बिलात दर्शविली जाईल़
-यात ५० टक्के बिल भरण्याचे हप्ते ३१ आॅगस्टपर्यंत बिलातील किमान २० टक्के, दुसरा हप्ता ३१ सप्टेंबरपर्यंत किमान २० टक्के व ३१ आॅक्टोबरपर्यंत उर्वरित रक्कम १० टक्के असे ५० टक्के भरावेल लागतील़ ५० टक्के रक्कम शासनाद्वारे अदा केली जाईल.
-देवळी उपविभागांतर्गत वायगाव (नि.), भीडी, गिरोली, देवळीतील अर्बन व रूरल असे पाच झोन आहेत़
-कृषी ग्राहकांवर ३ कोटी ५० लाख रुपयांची थकबाकी आहे. ही योजना सर्व सामान्यांपर्यंत पोहोचण्याची संबंधित ग्रा़पं़ माहिती देण्यात येणार आहे़