शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
3
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
4
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
5
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
6
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
7
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
8
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
9
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
10
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
11
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
12
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
13
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
14
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
15
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
16
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
17
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
18
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
19
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
20
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

पळसगावात ११ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2019 06:00 IST

घर पडल्याने नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर मुसळधार पावसामुळे परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुरामुळे दिग्रज, मारडा, पळसगाव (बाई) येथील ३२ शालेय विद्यार्थी व ४० नागरिकांना सिंदी रेल्वे येथील नगर विद्यालयाच्या शिक्षकांनी व सरपंच धिरज लेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरक्षीत ठिकाण असलेल्या नगर विद्यालय सिंदी येथे हलविले.

ठळक मुद्देशेतपिकांचेही नुकसान । परिसरातील नदी-नाले फुगले

लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : परिसरात झालेल्या सततच्या पावसादरम्यान पळसगाव (बाई) येथील ११ घरांची पडझड झाली. शिवाय शेतपिकांनाही त्याचा फटका बसल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. सदर नुकसानग्रस्तांना तातडीने शासकीय मदत देण्याची मागणी आहे.घर पडल्याने नागरिकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. तर मुसळधार पावसामुळे परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुरामुळे दिग्रज, मारडा, पळसगाव (बाई) येथील ३२ शालेय विद्यार्थी व ४० नागरिकांना सिंदी रेल्वे येथील नगर विद्यालयाच्या शिक्षकांनी व सरपंच धिरज लेंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरक्षीत ठिकाण असलेल्या नगर विद्यालय सिंदी येथे हलविले. शिवाय त्यांच्या जेणवाचीही व्यवस्था केली होती. १ सप्टेंबरपासून सतत थांबून थांबून मुसळधार पाऊस परिसरात पडत आहे. मुसळधार पावसामुळे पळसगाव (बाई) येथील बंडू झाडे, उमेश खोडके, रामदास देवतळे, मीरा हिंगे, सतीश भगत, भीमराव पाटील, कवडू पाटील, श्रावण शेंडे, दत्तू चिंतावार, नलु बोरकर, वासुदेव तांदुळकर यांच्या घराची पडझड झाली आहे. यात घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती सरपंच धिरज लेंडे यांनी तहसीलदार महेंद्र सोनवणे यांना दिली. त्यानंतर कोतवाल सतीश कुडमती, नारायण वाणी, ग्रा.पं. सदस्य मिना ठमके यांनी नुकसानीची पाहणी केली. तसेच अहवाल तयार करून तो तहसील कार्यालयाला पाठविला आहे. सततच्या पावसामुळे खोलगट भागातील शेत शिवारांना तळ्याचे स्वरूप आले आहे. शिवाय काही शेतात पाणीच पाणी असल्याने उभे पीक पिवळी पडत आहेत. नाल्याला आलेल्या पुरामुळे दिग्रज, मारडा, पळसगाव (बाई) येथील विद्यार्थी अडकून पडले होते. आपल्या गावी कसे जावे हा त्याच्या समोर प्रश्न होता. त्याची माहिती मिळताच नगर विद्यालय येथील शिक्षकांनी ३२ विध्यार्थी व ४० नागरिकांना शाळेत आणून कपडे दिले. शिवाय त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती. पुराचे पाणी ओसरल्यावर शाळकरी मुला-मुलींनी गावाचा रस्ता धरला. मदत कार्यात प्रा. गोपाल गवई, चंद्रशेखर डाकोळे, अंबरनाथ नानवतकर, प्रवीण मुळे, पृथ्वीराज दुबे, सरपंच धिरज लेंडे, राहुल गोल्हर, श्रीकांत बुरले आदींनी सहकार्य केले.

टॅग्स :Rainपाऊस