शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 21:28 IST

वीज पडल्याने २९ शेळ्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत शेळी पालकांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने रखवालदार थोडक्यात बचावले.

वर्धा तालुक्यातील जैतापूर शिवारात गुरुवार, २८ रोजी दुपारी ३:०० वाजताच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, वीज पडल्याने २९ शेळ्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत शेळी पालकांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने रखवालदार थोडक्यात बचावले.शेळ्या दगावल्याची माहिती मिळताच सरपंच छाया विलास उईके यांनी तहसीलदार, बीट अंमलदार आणि तालुका पशुधन विकास अधिकाऱ्यांना माहिती दिली. गावात माहिती होताच ग्रामस्थांनी परिसरात धाव घेतली. विजांचा आवाज होत असताना डोंगरगाव शिवारात चरण्यास गेलेल्या शेळ्यांच्या कळपावर वीज कोसळली. सर्व २९ शेळ्या जागीच दगावल्या. यामधे जैतापूर येथील देविदास उईके यांच्या मालकीच्या १६ शेळ्या, सुरेश चौधरी यांच्या मालकीच्या ४, पंकज सोनोने यांच्या मालकीच्या ३, वसंत कुसराम यांच्या मालकीच्या ३, भगवान जिवतूजी मडावी यांच्या २, किसन भुताजी उईके यांची १ शेळी होती. यासोबत दोन पाळीव श्वानदेखील दगावले. देखभाल करणारे रखवालदार देविदास माधव उईके आणि विश्राम किसना बोटरे हे थोडक्यात बचावले.

घटनास्थळ आहे जंगलात

वीज कोसळली ते स्थळ जंगलात आहे. त्यामुळे सायंकाळी ही घटना माहिती पडली. पशुधन विकास अधिकारी डॉ. राहुल नानोटकर आणि पशुधन पर्यवेक्षक डॉ. भालचंद्र जाणे यांनी शवविच्छेदन केले. तलाठी सविता भगत तसेच ग्रामसेवक कृष्णा कुरवाडे यांनी सरपंच छाया उईके, पोलिसपाटील सुनीता तंतरपाळे, माजी सरपंच गंगाधर मडावी यांच्या उपस्थितीत पंचनामा करून तहसील कार्यालयात अहवाल सादर केला.५.८० लाखांचे नुकसानपंचनामा करून तहसील कार्यालयात अहवाल सादर केला असता यात शेळी मालकांचे जवळपास ५ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीमुळे नुकसानग्रस्त आर्थिक संकटात सापडले आहेत. प्रशासनाने तातडीने नुकसान भरपाई मंजूर करावी, अशी मागणी सरपंच छाया उईके यांच्यासह ग्रामस्थांकडून केली जात आहे.

टॅग्स :AccidentअपघातMaharashtraमहाराष्ट्र